मुंबई, 20 मार्च: हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात चार नवरात्री असल्या तरी त्यांपैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र महत्त्वाच्या मानल्या जातात. यावर्षी, चैत्र नवरात्र बुधवार, 22 मार्च 2023 पासून सुरू होत आहे, जी 30 मार्च रोजी संपेल.
या वेळी देवीचे आगमन नौकेवर होणार आहे. शास्त्रात मातेचे हे रूप भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले गेले आहे. विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या काळात घटस्थापना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि प्रगतीकारक ठरू शकते.
नवीन हिंदू वर्ष चैत्र नवरात्री प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. या वेळी चैत्र नवरात्रीमध्ये नवरात्र पूर्ण नऊ दिवसांचे असेल. नवरात्रीची खास गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या एक दिवस आधी पंचक होणार आहे. पंचमी तिथीपर्यंत पाचव्या कालखंडात देवीची पूजा केली जाईल. पंचक काळ पूजेसाठी शुभ मानला जातो. सकाळी 6.23 ते 7.32 पर्यंत मंदिरात आणि अभिजीत मुहूर्तावर प्रत्येक घरात सकाळी 11.05 ते 12.35 या वेळेत घटस्थापना केली जाईल.
पंचक 19 मार्चपासून सुरू होत असून 23 मार्च रोजी संपेल. पण यावेळी पंचकासोबतच या दिवशी मीन राशीत 4 ग्रह एकत्र भ्रमण करतील. यासोबतच या दिवशी अनेक शुभ योगदेखील असतील जसे की, गजकेसरी योग, बुद्धादित्य योग, हंस योग, शश योग, धर्मात्मा आणि राज लक्ष योग देखील या दिवशी राहतील. अशा शुभ संयोगांमुळे पंचकची काळजी करण्याची गरज नाही. तथापि, भक्तांनी मनोभावे देवीची पूजा करावी, कारण देवी सर्व अशुभ प्रभाव दूर करण्यास समर्थ आहे, अशी पूर्वापार मान्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion