मराठी बातम्या /बातम्या /religion /

देशातील अशी ठिकाणं, ज्याचं नाव देवीच्या नावावरून ठेवण्यात आलंय; 'या' ठिकाणी नवरात्रोत्सवात भाविकांची होते मोठी गर्दी

देशातील अशी ठिकाणं, ज्याचं नाव देवीच्या नावावरून ठेवण्यात आलंय; 'या' ठिकाणी नवरात्रोत्सवात भाविकांची होते मोठी गर्दी

मंदिर आणि ठिकाण यांचं कनेक्शन, जाणून घ्या नवरात्री स्पेशल

मंदिर आणि ठिकाण यांचं कनेक्शन, जाणून घ्या नवरात्री स्पेशल

देशातल्या काही शहरांचं नामकरण हे दुर्गा देवी तसेच तिच्या अवतारांवरून झालं आहे. ते ठिकाण कोणतं आणि कुठे आहे? चला जाणून घेऊ

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 26 सप्टेंबर : देशभरात आज नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. या कालावधीत देवीची विशेष पूजा आणि आराधना केली जाते. महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी घरोघरी घटस्थापना केली जाते. तसंच राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांसह देवीच्या मंदिरांमध्ये लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. देशात अशी काही शहरं किंवा ठिकाणं आहेत, ज्यांचं नामकरण हे दुर्गा देवीच्या नावांवरून झालं आहे. या ठिकाणी देवीची नितांत सुंदर मंदिरं असून, येथेदेखील नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्रिपुरा, श्रीनगर, मुंबई या महत्त्वाच्या ठिकाणांचं नामकरण हे देवीच्या नावावरून झालं आहे. तसंच अन्य काही शहरांचं नामकरण या पद्धतीनं झालं आहे.

नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. आता नऊ दिवस भाविक देवीची मनोभावे पूजा, आराधना करतात. शक्तीचा हा उत्सव देशभरात साजरा केला जातो. देशातल्या काही शहरांचं नामकरण हे दुर्गा देवी तसेच तिच्या अवतारांवरून झालं आहे.

-पौराणिक कथांनुसार पाटणा येथे सती देवीची डावी जांघ पडली होती. त्यामुळे या ठिकाणी दुर्गा देवीच्या रूपात पटन देवीच्या सन्मानार्थ मंदिर बांधण्यात आलं आहे.

-त्रिपुरा हे एक प्राचीन आणि सुंदर असं ठिकाण आहे. मात्र ईशान्य भारतातल्या या राज्याचं नाव त्रिपुरसुंदरी मंदिरावरून पडलं. हे मंदिर आगरतळापासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावरील एका टेकडीवर स्थित आहे.

-पंजाबमधल्या चंडीगड या शहराचं नाव हे चंडी देवीच्या नावावरून पडलं असल्याचं फार कमी लोकांना माहिती आहे. येथे चंडी देवीचं एक मंदिर आहे. स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये या मंदिराचं धार्मिक महत्त्व अधिक आहे.

-उत्तर भारतात पर्यटन म्हटलं की सर्वांच्या आवडतं पहिलं ठिकाण म्हणजे श्रीनगर होय. पण या ठिकाणाचं श्रीनगर हे नाव देवीच्या नावावरून पडलं आहे. हे शहर शारिका देवी मंदिरात श्री चक्र रुपात प्रकट झालेल्या श्री किंवा लक्ष्मी देवीचं घर आहे, असं म्हटलं जातं.

-मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. या मायानगरीचं नामकरण मुंबा देवीच्या मंदिरावरून झालं आहे. मुंबईतल्या झवेरी बाजार भागात मुंबादेवीचं मंदिर आहे. हे मंदिर खूप पुरातन आहे. महाअंबा देवीच्या सन्मानार्थ सुमारे 500 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं गेलं. त्यावरून मुंबापुरी असं नाव पडलं आणि त्याचं पुढे मुंबई झालं.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या मंदिरांमध्ये रोज देवीचे पूजाविधी होत असतात. तसंच या ठिकाणी नऊ दिवस भाविक दर्शनासाठी मोठी गर्दीदेखील करतात.

First published: