मराठी बातम्या /बातम्या /religion /

Navratri 2022 : काय आहे घटस्थापनेचं महत्त्व, पाहा पूजाविधी आणि देवीची आरती, Video

Navratri 2022 : काय आहे घटस्थापनेचं महत्त्व, पाहा पूजाविधी आणि देवीची आरती, Video

शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्वाचा असतो कारण त्यादिवशी घटस्थापना होते. घटस्थापनेचा शब्दश: अर्थ घट वाढणे हा आहे.

शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्वाचा असतो कारण त्यादिवशी घटस्थापना होते. घटस्थापनेचा शब्दश: अर्थ घट वाढणे हा आहे.

शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्वाचा असतो कारण त्यादिवशी घटस्थापना होते. घटस्थापनेचा शब्दश: अर्थ घट वाढणे हा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 24 सप्टेंबर : गणेशोत्सवानंतर सुरू झालेला पितृपक्ष रविवार, 25 सप्टेंबर रोजी संपला. त्यानंतर सोमवारी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रला सुरूवात झाली आहे. विजयादशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या या शारदीय नवरात्रीचं हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेचं महत्त्व काय आहे? या सर्व गोष्टींची माहिती धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितली आहे.

घटस्थापनेचे महत्व काय आहे ?

नऊ दिवसांच्या या उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते.  शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्वाचा असतो कारण त्यादिवशी घटस्थापना होते. घटस्थापनेचा शब्दश: अर्थ घट वाढणे हा आहे.

'दरवर्षी आपण शक्ती मातेची उपासना करतो.  शक्ती मातेची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनात समृध्दी,सौख्य त्याबरोबर एक शक्ती किंवा उत्तम आरोग्य आणि वंश वृध्दी होते,' असं देवी भागवत पुराणात सांगितलं असल्याची डॉ. धारणे यांनी दिली आहे.

Beed : आदिशक्तीच्या सुंदर मूर्तींनी बाजारपेठ सजली!, पाहा Video

घटस्थापना अशी करा

आपल्या सर्वांचं आयुष्य आनंदी असावं, या आयुष्यात आनंद कायम राहावा यासाठी घटस्थापना केली जाते. घटस्थापना करताना एक एक तांब्याचा तांब्या घ्या.. त्याच्यात पाणी टाका,विड्याची,आंब्याची पाने घ्या, ती कलशात ठेवा. तांब्याच्या चार ही दिशांना स्वस्तिक काढावे आणि तो कलश लालमातीमध्ये स्थापित करा. त्यानंतर ताटात किंवा परातीमध्ये लाल माती घेऊन त्यात सप्त धान्य टाका,आणि तो कलश स्थापना करा,आणि विधिवत पुजा करा. कलश ज्या ठिकाणी स्थापन कराल, तिथंच तो संपूर्ण नवरात्रीमध्ये ठेवा तो तिथून हलवू नका असा सल्ला भारणे यांनी दिला आहे.

प्रतिपदा तिथी प्रारंभ :  सोमवार, 26 सप्टेंबर 2022, पहाटे 3 वाजून 23 मिनिटे

प्रतिपदा तिथी समाप्त :  मंगळवार, 27 सप्टेंबर 2022, पहाटे 3 वाजून 08 मिनिटे

Navratri 2022: नवरात्रीत दिशेशी संबंधित या चुका करू नका, पूजा करताना हे नियम पाळा

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी। हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥साही विवाद करितां पडिले प्रवाही। ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा। नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

First published:

Tags: Navratri, Religion