मराठी बातम्या /बातम्या /religion /

Navratri : नवरात्रीचा चौथा दिवस, कुष्मांडा देवीची अख्यायिका आणि पूजाविधी, Video

Navratri : नवरात्रीचा चौथा दिवस, कुष्मांडा देवीची अख्यायिका आणि पूजाविधी, Video

Navratri : नवरात्र उत्सवातील चौथा दिवस मध्ये अश्विन शुद्ध चतुर्थी. आजच्या दिवशी देवीची कुष्मांडा रूपामध्ये पूजा केली जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 29 सप्टेंबर :  नवरात्र उत्सवातील चौथा दिवस मध्ये अश्विन शुद्ध चतुर्थी. आजच्या दिवशी देवीची कुष्मांडा रूपामध्ये पूजा केली जाते. देवीचे हे रूप रोगनाशक आणि अरिहंता आहे, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. कुष्मांडा म्हणजे कोहळा होय! आजच्या दिवशी देवीला कोहळा अतिशय प्रिय असतो. त्यामुळेच देवीला कुष्मांड हे नाव प्राप्त झाले आहे. आज देवीला कोहळ्याची पेठा अथवा यज्ञामध्ये कोहळ्याचे तुकडे करून अर्पण केले जातात. पंडित वसंत गाडगीळ यांनी या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे.

कुष्मांडा देवीची कथा

सुरा - संपूर्ण कलशं रुधिराप्लुतम् एव च । दधाना हस्त-पद्माभ्यां कूष्माण्डा शुभदाऽस्तु मे ।

कुष्मांडा देवीनं आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते. सृष्टीच्या चारी बाजूला आंधार पसरलेला होता. सृष्टीचे अस्तित्वही नव्हते. त्यावेळी देवीनं ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.

कुष्मांडा देवीचा निवास हा सुर्य मंडलाच्या आतमध्ये आहे. आपण सूर्याकडे क्षणभरही पाहू शकत नाही. त्या सूर्यमंडलाच्या आतील भागात ही देवी राहते. त्यावरून या देवीचे तेज आपल्याला समजू शकेल. या देवीची कांती आणि प्रभा ही सुर्याप्रमाणेच प्रकाशमान आहे. त्यामुळे तिच्यामुळे दहा दिशा उजळून जातात.

कुष्मांडा देवी अष्टभूजा आहे. या अष्टभूजांमध्ये बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू धारण केले आहे. तर दुसऱ्या भूजामध्ये सिद्धि आणि निधिया युक्‍त माळा आहे. या देवीचे वाहन सिंह आहे. या देवीच्या उपासकाचे मन अनाहत चक्रामध्ये उपस्थित असते. त्यामुळे आजच्या दिवशी शुद्ध मनाने आणि पवित्र भावनेतून देवीची पूजा आणि अर्चना करावी, असे गाडगीळ यांनी सांगितले.

Video : औंधसूराचा वध करणारी यमाई देवी, मूळपीठचा आहे रंजक इतिहास

पूजेचा मंत्र

ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

या मंत्रांच्याद्वारे अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवीची विशेष आराधना करावी. आपल्यला धन, आरोग्य, समृद्धी मिळावी यासाठी देवीला प्रार्थना करावी, असे गाडगीळ यांनी सांगितले.

First published:

Tags: Culture and tradition, Navratri, Pune