मुंबई, 11 ऑगस्ट: Narali Purnima 2022 Facebook WhatsApp Marathi Messages: भारतात प्रत्येक सणाला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व असते. श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव येतात. त्यापैकीच एक म्हणजे नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते. यंदा 11 ऑगस्ट 2022 रोजी नारळी पौर्णिमा आहे. कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेला फारच आगळंवेगळं महत्व असतं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधवच नाही तर इतर नागरिकही एकमेकांना शुभेच्छा देतात. नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस Narali Purnima Messages, Narali Purnima HD Images सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहुयात नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस.
हे वाचा - Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Narali Purnima 2022 Messages)
दर्या सागर हाय आमुचा राजा...
त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा...
नारली पुनवेला नारळ सोन्याचा...
सगळे मिळूनशी मान देताव दर्याला...
सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सण नारली पुनवेचा,
दर्या सारंगा नमन तुजला !
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
सण आज आला
नारळी पौर्णिमेचा
सागरपुत्रांच्या आनंदाचा
दर्या राजा असे देव त्यांचा
रक्षणकर्ता तो सकलांचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !
कोळी बांधवांचा सण,
उधाण आनंदाला,
कार्यारंभ करती,
अर्पूण नारळ सागराला...
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सण आयलाय गो आयलाय गो
नारळी पुनवेचा !
मनी आनंद मावना
कोळ्यांचे दुनयेचा !
अरे बेगीन बेगीन चला किनारी
जाऊ देवाच्या पुंजेला...
हात जोडूनी नारळ सोन्याचा सोडूया दर्याला !
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
कोळीवारा सारा सजलाय गो...
कोळी यो नाखवा आयलाय गो...
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सण जिव्हाळ्याचा दिवस आज
नारळी पौर्णिमेचा
समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raksha bandhan, Religion