मराठी बातम्या /बातम्या /religion /

Nagpanchami : यंदा नागपंचमीला तयार होणार शुभ योग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि पद्धती

Nagpanchami : यंदा नागपंचमीला तयार होणार शुभ योग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि पद्धती

श्रावण महिना हा सणांचा महिना आहे. या महिन्यातील इतर सणांप्रमाणेच नागपंचमी (Nag Panchami) सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकरांसोबतच (Lord Shiva) नागदेवतेची पूजा केली जाते.

श्रावण महिना हा सणांचा महिना आहे. या महिन्यातील इतर सणांप्रमाणेच नागपंचमी (Nag Panchami) सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकरांसोबतच (Lord Shiva) नागदेवतेची पूजा केली जाते.

श्रावण महिना हा सणांचा महिना आहे. या महिन्यातील इतर सणांप्रमाणेच नागपंचमी (Nag Panchami) सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकरांसोबतच (Lord Shiva) नागदेवतेची पूजा केली जाते.

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : श्रावण महिना हा सणांचा महिना आहे. या महिन्यातील इतर सणांप्रमाणेच नागपंचमी (Nag Panchami) सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकरांसोबतच (Lord Shiva) नागदेवतेची पूजा केली जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची नव्हे तर नागदेवतेच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी. या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. राजस्थान पत्रिकाने या संदर्भात वृत्त दिलंय.
यंदा 2 ऑगस्ट 22 रोजी मंगळवारी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. नागपंचमीला शिवयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, असं पं. गुलशन अग्रवाल यांनी सांगितलंय. शिवयोग संध्याकाळी 6.38 मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सिद्धी योग सुरू होईल. शास्त्रानुसार या योगांमध्ये केलेल्या कामात यश प्राप्त होतं.
नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त
मंगळवारी नागपंचमी तिथी दिवसभर आणि रात्रभर राहील. पंचमी तिथी दुसऱ्या दिवशी पहाटे 5.43 ते बुधवारी सायंकाळी 5.43 वाजेपर्यंत राहील. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ पहाटे 5.43 ते 8.25 वाजेपर्यंत असेल. नागपंचमीच्या दिवशी सुमारे साडेतीन तास पूजेचा शुभ मुहूर्त असेल. पंचांगानुसार या वर्षी नागपंचमीच्या दिवशी अत्यंत शुभ मानला जाणारा शिवयोग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल.
मंगळागौरी व्रतही करता येणार
या वर्षी नागपंचमीला विशेष योग तयार होत आहे. नागपंचमीच्या दिवशी तिसरं मंगळागौरीचं व्रत केलं जाणार आहे. श्रावण महिन्यात सोमवारच्या उपवासासोबतच मंगळवारच्या उपवासालाही विशेष महत्त्व आहे. मंगळवारचा उपवास देवी पार्वतीला समर्पित मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी व्रत करायला हवं, असं म्हटलं जातं.
नागपंचमीचं धार्मिक आणि ज्योतिषातलं महत्त्व
हिंदू धर्मात नागदेवतेची पूजा सुख, समृद्धी आणि सौभाग्य देणारी मानली जाते. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्यास शत्रूंचं भय राहत नाही आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं. तसंच नागदेवतेची पूजा केल्याने माणसाच्या आयुष्यात सर्पदंशाची भीती राहत नाही आणि जन्मकुंडलीशी संबंधित कालसर्प दोषही दूर होतो, असं म्हटलं जातं.
श्री सर्प सुक्ताचं पठण फायदेशीर
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला नागदेवतेची पूजा करणं आणि श्री सर्प सूक्ताचं पठण करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या नाग आणि नागिणीची पूजा केली जाते. या दिवशी नाग मंदिर आणि शिव मंदिरात जाऊन नागदेवतेला दूध अर्पण करून कुटुंबाच्या सुख-
समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी घरी शेण किंवा मातीने नागदेवतेची आकृती बनवून पूजा केली जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार गिरीश व्यास यांनी सांगितलं की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास हा दोष संपतो. जन्मकुंडलीत कालसर्प दोष असणारी व्यक्ती नेहमी निराश राहते आणि तिच्या जीवनात अनेक समस्या येतात. कुंडलीतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी नागपंचमीला अनेक उपाय केले जातात. काल सर्प दोष दूर करण्यासाठी श्री सर्प सूक्ताचं पठण अत्यंत लाभदायक मानलं जातं.
कुम्हारखाडीत भरणार भव्य जत्रा
राजस्थानातील कुम्हारखाडी येथील पुरातन मंदिरात नागपंचमीनिमित्त भव्य जत्रा भरणार आहे. पहाटेपासूनच संपूर्ण शहरातून भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात पूजा, अभिषेक, महाआरती करतील. भाविक ज्या दुधाचा अभिषेक करतील त्या दुधापासून पंचामृत तयार करून ते प्रसादाच्या स्वरूपात भाविकांना दिलं जाईल. तसंच विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाणार आहे, असं मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश पानवाले व यात्रा संयोजक महेश कश्यप यांनी सांगितलं.
First published:

Tags: Festival, Social media

पुढील बातम्या