Nag panchami 2022 : नागपंचमीला बनत आहे अद्भुत योग; काय करावं, काय करू नये वाचा सविस्तर

Nag panchami 2022 : नागपंचमीला बनत आहे अद्भुत योग; काय करावं, काय करू नये वाचा सविस्तर

नागदेवाची पूजा केल्याने सापांविषयीची भिती दूर होते असे मानले जाते. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्यांनीही या दिवशी काही विशेष उपाय केल्यास त्यांच्या कुडलीतील दोष दूर होतो अशीही मान्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : नागपंचमी सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. यंदा नागपंचमी 2 ऑगस्ट रोजी (मंगळवारी) आहे. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने संकट दूर होतात. काही धार्मिक ग्रंथांमध्ये नागांचे वर्णन शिवप्रभूंचा अलंकार आणि विष्णूची शय्या म्हणून आढळतो. त्यामुळे हिंदू धर्मात नागाला पूजनीय स्थान आहे. अनेक ठिकाणी शिवलिंगावर देखील नागाच्या मूर्ती स्थापित आहेत आणि त्यांची पूजा केली जाते.

नागपंचमीच्या दिवशी बनत आहे अदभुद योग

एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नागपंचमीला विशेष योग्य जुळून येत आहेत. नागपंचमीच्या दिवशी शिवयोग आणि सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहेत. शिवयोग संध्याकाळी 06.38 पर्यंत राहील आणि त्यानंतर सिद्धी योग सुरू होईल. या दोन्ही योगांमध्ये पूजा केल्याने शिव आणि नागदेव यांची विशेष कृपा प्राप्त होते. भक्तांच्या सर्व इच्छा या काळात पूजा केल्याने पूर्ण होतील आणि यश मिळेल.

यावर्षी नागपंचमीच्या दिवशीही मंगळा गौरीदेखील आहे. या दिवशी विवाहित महिला उपवास करतात. श्रावणातील दार मंगळवारी हे व्रत केले जाते आणि यावर्षी नागपंचंमीदेखील मंगळवारीच आली आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नाग देवांबरोबर महादेव आणि देवी पार्वतीचीदेखील पूजा केली जाणार आहे.

नागपंचमीच्या दिवशी काय करावे

- पंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजेसाठी तयार व्हावे.

- पूजेच्या ठिकाणी नागदेवताचे चित्र लावावे किंवा मातीपासून नागदेवता बनवून लाल कापड पसरून पाटावर स्थापित करावे.

- नागदेवतेला हळद, रोळी, तांदूळ, कच्चे दूध आणि फुले अर्पण करा. त्यानंतर कच्चे दूध, तूप, साखर मिसळून नागदेवतेला अर्पण करा.

- नाग पंचमी मंत्राचा जप करा.

- नागपंचमीच्या दिवशी उपवास ठेवा. या दिवशी उपवास केल्याने साप कधीच दंश करत नाही, असे मानले जाते.

- ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी आवर्जून व्रत ठेवावे.

Nagpanchami Information in Marathi : नागपूजा कथा, महत्त्व आणि मुहूर्त; नागपंचमीची संपूर्ण माहिती

नागपंचमीच्या दिवशी काय करू नये

- नागपंचमीच्या दिवशी माती खणू नये, त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो.

- शेतकऱ्यांनी नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये.

- सापाला किंवा नागाला दूध अर्पण करा, पण ते त्यांना पाजण्याचा प्रयत्न करू नका. नाग देवताला दूध अर्पण करतात, ते पाजले जात नाही.

- प्राण्यांना मारू नका, सापाला कोणत्याही प्रकारे इजा करू नका.

- या दिवशी झाडे तोडू नका. कारण यामुळे झाडांमध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते.

- काही मान्यतेनुसार, यादिवशी शिवणकाम म्हणजेच सुईचा वापर, लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवणे, लोखंडी भांड्यात अन्न खाणे, कात्री वापरणे किंवा चाकूने भाजी कापण्याचे काम करू नका. कारण ते अशुभ मानले जाते.

नागपंचमी शुभ मुहूर्त

नागपंचमीला योग्य मुहूर्तावर भगवान शिव आणि नागांची पूजा करणे शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी पहाटे 05:43 ते 08:25 पर्यंत नागपंचमीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे.

Money Mantra : काही झालं तरी कुणालाही पैसे उधार देऊ नका; तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी 'मनी मंत्र'

अशुभ मुहूर्त

राहुकाळ - दुपारी 03:49 ते दुपारी 05:30 वाजेपर्यंत

यमगण्ड - सकाळी 09:05 ते सकाळी 10:46 वाजेपर्यंत

गुलिक काल - दुपारी 12:27 ते दुपारी 02:08 वाजेपर्यंत

विडाल योग - सायंकाळी 05:29 ते ३ ऑगस्ट पहाटे 05:43 वाजेपर्यंत

Published by: Pooja Jagtap
First published: August 2, 2022, 6:00 AM IST

ताज्या बातम्या