Nagpanchami Information in Marathi : नागपूजा कथा, महत्त्व आणि मुहूर्त; नागपंचमीची संपूर्ण माहिती

Nagpanchami Information in Marathi : नागपूजा कथा, महत्त्व आणि मुहूर्त; नागपंचमीची संपूर्ण माहिती

यंदा 2 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे. नागपंचमी सणाविषयी संपूर्ण मराठीत माहिती वाचा.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक नागपंचमी देखील आहे. नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा करण्याची प्रथा आहे. नागपंचमी सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. यंदा नागपंचमी 2 ऑगस्ट रोजी (मंगळवारी) आहे. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने संकट दूर होतात. काही धार्मिक ग्रंथांमध्ये नागांचे वर्णन शिवप्रभूंचा अलंकार आणि विष्णूची शय्या म्हणून आढळतो. त्यामुळे हिंदू धर्मात नागाला पूजनीय स्थान आहे. अनेक ठिकाणी शिवलिंगावर देखील नागाच्या मूर्ती स्थापित आहेत आणि त्यांची पूजा केली जाते. जाणून घेऊया नागपंचमी सणाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त...

नागपंचमी शुभ मुहूर्त?

पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील

नागपंचमी तिथी - 2 ऑगस्ट रोजी (मंगळवार)

नागपंचमी तिथी प्रारंभ - 2 ऑगस्ट (मंगळवार) पहाटे 05:13 वाजता

नागपंचमी तिथी समाप्ती - 3 ऑगस्ट (बुधवार) पहाटे 05:42 वाजता

Numerology : तुमची जन्मतारीख सांगतेय नक्की होणार तुमचं प्रमोशन; अंकशास्त्रानुसार पाहा भविष्य

नागपंचमी शुभ योग?

नागपंचमीची उगवती तिथी 2 ऑगस्ट आहे. त्यामुळे शास्त्रानुसार या दिवशी नागपंचमीचा सण साजरा करणे योग्य ठरेल. या दिवशी उत्तरा फाल्गुनी आणि हस्त नक्षत्र असल्यामुळे धाता आणि सौम्य नावाचे दोन शुभ योग तयार होत आहेत. याशिवाय शिव आणि सिद्ध नावाचे इतर 2 शुभ योगही या दिवशी राहतील.

Money Mantra : काही झालं तरी कुणालाही पैसे उधार देऊ नका; तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी 'मनी मंत्र'

नागपंचमीचे महत्त्व

नागपंचमीच्या दिवशी महिला वारुळात दूध आणि लाह्या अर्पण करून नागदेवाची पूजा करतात. नागदेवाची पूजा केल्याने सापांविषयीची भिती दूर होते असे मानले जाते. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्यांनीही या दिवशी काही विशेष उपाय केल्यास त्यांच्या कुडलीतील दोष दूर होतो अशीही मान्यता आहे.

Published by: Pooja Jagtap
First published: August 1, 2022, 3:47 PM IST

ताज्या बातम्या