Muharram Tazia 2022 : कसा साजरा केला जातो मोहरम? ताजिया म्हणजे काय?

Muharram Tazia 2022 : कसा साजरा केला जातो मोहरम? ताजिया म्हणजे काय?

ताजिया ही इमाम हुसैन यांच्या समाधीची प्रतिकृती आहे. ती अनेक प्रकारात आणि आकारात बनविली जाते. ताजिया हा शब्द अरबी अझा या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ मृतांचे स्मरण करणे असा होतो.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : हिजरी कॅलेंडरमधील दुसरा सर्वात पवित्र महिना, मोहरम इस्लामिक नवीन वर्षाची सुरुवात असते. 2022 मधील इस्लामिक नवीन वर्ष 30 जुलै रोजी सुरू झाले आहे. महिन्याचा दहावा दिवस जगभरातील मुस्लिम आशुरा म्हणून पाळतात. या दिवशी मशिदींमध्ये उपवास आणि विशेष प्रार्थना केली जाते. करबलाच्या युद्धात शाहिद झालेल्या प्रोफेट मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांची पुण्यतिथी या दिवशी साजरी केली जाते. मुळात ताजिया ही इमाम हुसैन यांच्या समाधीची प्रतिकृती आहे आणि ती असंख्य रूपात आणि आकारात बनविली जाते. ताजिया हा शब्द अरबी अझा या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ मृतांचे स्मरण करणे असा होतो.

मोहरमच्या पहिल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला आणि नवव्या दिवसाच्या दरम्यान कोणत्याही दिवशी समाधीची ही प्रतिकृती घरी आणली जाऊ शकते. इमाम हुसेन शहीद झाले तेव्हा आशुराच्या दहाव्या दिवशी हे दफन केले जाते. म्हणून ताजियत म्हणजे मृत व्यक्तीला तुमची शोक, श्रद्धांजली आणि आदर व्यक्त करणे.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी या 5 भाज्या आहेत सर्वोत्तम; आहारात घ्या

एका अर्थाने ताजिया हे प्रतीकात्मकता आहे. ज्याभोवती करबलाच्या शोकांतिकेचे चित्रण फिरते. ताजिया आझाखानाच्या आत लावला जातो, ज्याला सामान्यतः इमामबाडा म्हणून ओळखले जाते, जे मोहरमसाठी खास बनवलेले तात्पुरते क्षेत्र आहे.

मुस्लीम समाजातील सदस्य ताजियासोबत ढोल वाजवत आणि या हुसेनचा जयघोष करत मिरवणुकीत येतात. ताजियाचे आगमन हे शोक सुरू होण्याचे लक्षण आहे. इमांबड्यात ताजिया बसवण्याबरोबरच आझाखानाही फुले व इत्तर घालून तयार केला जातो, कारण येथे लोक शोक करतात.

डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

रंगीबेरंगी कागद, फुले, दिवे आणि आरसे यांचा वापर करून लोक ताजिया बनवताना त्यांची सर्जनशीलता दाखवतात. ताजिया आणि ढोल-ताशांशिवाय उंट, हत्ती, घोडे यांसारखे प्राणीही मिरवणुकीत सामील होतात.

Published by: Pooja Jagtap
First published: August 9, 2022, 6:15 AM IST

ताज्या बातम्या