आर्थिक तंगी होणार नाही, नेहमी खुळखुळेल पैसा; अपराजिता फुलाचे हे सोपे उपाय करून बघा

आर्थिक तंगी होणार नाही, नेहमी खुळखुळेल पैसा; अपराजिता फुलाचे हे सोपे उपाय करून बघा

अपराजिता फुलाचे काही उपाय आपल्या पैशांशी संबंधित अडचणी सोडवू शकतात, शिवाय प्रगतीचे मार्गही खुले (Aparajita Flower Remedies) होतात. वास्तुशास्त्रामध्येही अपराजिता वनस्पतीचे अनेक फायदे सांगितले आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 04 ऑगस्ट : ज्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, त्या घरात कधीही ऐश्वर्य आणि वैभवाची कमतरता भासत नाही आणि ते घर ऐश्वर्याने भरलेले राहते. पण कधी-कधी असं होतं की, कष्ट करून पूजा-अर्चा करूनही घरात नेहमी पैशांची कमतरता भासते. असं वास्तू दोष किंवा ग्रह दोषांमुळे होऊ शकतं. काही साधे उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्या आपल्या आयुष्यातून नाहीशा होऊ शकतात. अपराजिता फुलाचे काही उपाय आपल्या पैशांशी संबंधित अडचणी सोडवू शकतात, शिवाय प्रगतीचे मार्गही खुले (Aparajita Flower Remedies) होतात.

वास्तुशास्त्रामध्येही अपराजिता वनस्पतीचे अनेक फायदे सांगितले आहेत, त्यामुळे आपल्या बागेत अपराजिताची रोपे लावावीत. त्याची फूलं दिसायलाही खूप सुंदर आहेत. अपराजिताची फुले जांभळ्या आणि पांढर्‍या रंगाची असतात. या फुलाशी संबंधित उपाय देखील प्रभावी ठरतात. दिल्लीचे ज्योतिषी आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया, अपराजिता फुलाशी संबंधित सोपे आणि खात्रीशीर उपाय.

धनप्राप्तीसाठी अपराजिताचे हे उपाय करा -

पाकीट/ पर्ससाठी उपाय -

आपल्या घरातील तिजोरी किंवा आपलं पाकीट नेहमी रिकामं होत असेल म्हणजेच आर्थिक चणचण भासत असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या चरणी अपराजिताचे फूल अर्पण करावे आणि नंतर हे फूल आपल्या पर्समध्ये किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने आपल्या आर्थिक अडचणी सुटतील आणि नेहमी पैसा तुमच्याकडे येत राहतील.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

आर्थिक समस्यांसाठी -

पैशाची समस्या, आर्थिक चणचण नेहमीच जाणवत असेल आणि हातात पैसा राहत नसेल, तर सोमवारी 5 अपराजिता फुले एकत्र वाहत्या नदीत सोडावीत. यामुळे पैशाशी संबंधित समस्या लवकरच दूर होईल आणि तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

नोकरी-व्यवसायासाठी-

नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर त्यासाठी अपराजिता वनस्पतीशी संबंधित हा उपाय अवश्य करा. अपराजिता रोपाची मुळे एका निळ्या कापडात बांधा आणि त्याचा एक छोटा गठ्ठा बनवा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या बाहेर लटकवा. त्यामुळे दिवसरात्र कामात चौपट प्रगती होऊ लागते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 4, 2022, 7:45 AM IST

ताज्या बातम्या