मराठी बातम्या /बातम्या /religion /

Money Mantra : ऑनलाईन शॉपिंग टाळा; आज या राशीला आर्थिक तोटा, हातच्या संधी जाण्याची शक्यता

Money Mantra : ऑनलाईन शॉपिंग टाळा; आज या राशीला आर्थिक तोटा, हातच्या संधी जाण्याची शक्यता

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (28 सप्टेंबर 2022) राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (28 सप्टेंबर 2022) राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (28 सप्टेंबर 2022) राशिभविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (28 सप्टेंबर 2022) राशिभविष्य.

मेष (Aries) : व्यवसायाचे निर्णय स्पष्टपणे विचार करून घ्या. वायफळ गोष्टींत वेळ वाया घालवू नका नाहीतर तोटा होईल आणि हातच्या संधी जातील.

उपाय : गणपतीबाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवा.

वृषभ (Taurus) : आर्थिक बाबींत नशीब साथ देईल. स्थिरस्थावर व्यवसायाची व्याप्ती वाढेल. ऑफिसात चोरी होऊ शकते. ऑनलाईन फसवणुकीला तुम्ही बळी पडू शकता.

उपाय : मारुतीच्या मंदिरात नारळ अर्पण करा.

मिथुन (Gemini) : आजचा दिवस फारसा चांगला नाही. एखाद्या अचानक आलेल्या कामासाठी कर्ज काढावं लागेल. सही करण्यापूर्वी कागदपत्रं व्यवस्थित वाचा.

उपाय : आदित्य हृदयस्तोत्र म्हणा.

कर्क (Cancer) : आर्थिक स्थिती सुधारेल. दीर्घ काळ अडकलेले पैसे मिळतील. हे पैसे घरात खर्च न करता योग्य सल्ला घेऊन गुंतवा, भविष्यात चांगला नफा होईल.

उपाय : गायींना गूळ खायला द्या.

सिंह (Leo) : ऑफिसात बढती मिळू शकते. पैसे खर्च करताना विचार करा नाहीतर पश्चात्ताप करावा लागेल. बचत करा.

उपाय : गरिबांना अन्नदान करा.

कन्या (Virgo) : ऑफिसात वरिष्ठांचं तुमच्याबद्दलचं मत बिघडू शकतं. अचानक आर्थिक फायदा होईल. डोळे बंद ठेवून कुणावर विश्वास ठेवू नका.

उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात मोरपिसं दान करा.

तूळ (Libra) : ऑफिसात कष्ट करावे लागतील त्याचे उत्तम परिणामही होतील. व्यावसायिकांना दिवस कटकटीचा. कुठलाही करार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

उपाय : हनुमान चालिसा म्हणा.

वृश्चिक (Scorpio) : ऑफिसात यशस्वी झाल्याने मनोबल उंचावेल. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमची घासाघीस करण्याची शक्ती वाढेल. वैवाहिक आयुष्यात उब जाणवेल.

उपाय : श्रीशंकरांना अभिषेक करा.

धनू (Sagittarius) : व्यवसायात नफा होईल. अडकलेले पैसे मिळाल्याने आनंद होईल. वायफळ गोष्टींत वेळ वाया घालवू नका. एकावेळी एकच काम करा.

उपाय : घरातून निघण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या.

मकर (Capricorn) : छोट्या व्यावसायिकांचे व्यवहार चांगले होतील. नोकरदारांना तोटा संभवतो, सावध रहा. कुणालाही विचारपूर्वकच पैसे द्या.

उपाय : ॐ नम: शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा.

कुंभ (Aquarius) : अचानक आलेल्या अडचणींमुळे आर्थिक परिस्थिती खालावेल. अनपेक्षित तोटा संभवतो. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल ही जमेची बाजू.

उपाय : रामाच्या मंदिरात बसून श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणा.

मीन (Pisces) : सगळ्यांना सोबत घेऊन चला. भावंडांत वाद होऊ शकतो. दीर्घकाळ अडकलेले पैसे सहज परत मिळतील.

उपाय : श्री हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Money