मराठी बातम्या /बातम्या /religion /

हातातून पैसे खाली पडण्याचे असे असतात शुभ-अशुभ संकेत; धनहानी टाळण्याचे उपाय

हातातून पैसे खाली पडण्याचे असे असतात शुभ-अशुभ संकेत; धनहानी टाळण्याचे उपाय

पैसे ठेवताना किंवा देताना कधी-कधी हातातून खाली पडतात. अनेकांना ही सर्वसाधारण बाब वाटेल, परंतु वास्तूमध्ये हातातून पैसे खाली पडण्याचे अनेक शुभ-अशुभ संकेत सांगितले आहेत.

पैसे ठेवताना किंवा देताना कधी-कधी हातातून खाली पडतात. अनेकांना ही सर्वसाधारण बाब वाटेल, परंतु वास्तूमध्ये हातातून पैसे खाली पडण्याचे अनेक शुभ-अशुभ संकेत सांगितले आहेत.

पैसे ठेवताना किंवा देताना कधी-कधी हातातून खाली पडतात. अनेकांना ही सर्वसाधारण बाब वाटेल, परंतु वास्तूमध्ये हातातून पैसे खाली पडण्याचे अनेक शुभ-अशुभ संकेत सांगितले आहेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 16 ऑगस्ट : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता भासू नये आणि आपल्यावर धनाची देवी लक्ष्मीची कृपा कायम असावी. वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला धनलाभ आणि धनहानी या दोन्हीची चिन्हे जाणवत असतात. हातातून पैसे वारंवार खाली पडणे हे अनेक गोष्टींचे लक्षण आहे. अनेकदा आपण खिशातून पैसे काढतो तेव्हा चुकून पैसे खाली पडतात. पैसे ठेवताना किंवा देताना कधी-कधी हातातून खाली पडतात. अनेकांना ही सर्वसाधारण बाब वाटेल, परंतु वास्तूमध्ये हातातून पैसे खाली पडण्याचे अनेक शुभ-अशुभ संकेत सांगितले आहेत. हातातून पैसे पडणे भविष्यातील चांगल्या-वाईट दोन्ही घटनांचे संकेत असू शकतात. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांनी याविषयी माहिती दिली (Money Falling Indication) आहे. हातातून पैसे खाली पडणे शुभ-अशुभ सकाळच्या वेळी हातातून पैसे खाली पडणे शुभ मानले जाते. यामुळे कदाचित तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि घरातून बाहेर पडताना हातातून पैसे पडत असतील तर ते देखील शुभ चिन्ह मानले जाते. यावरून असे सूचित होते की, तुमचे रखडलेले पैसे परत येणार आहेत किंवा पैसे मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार कपडे परिधान करताना खिशातून नाणे किंवा नोट पडली तर ते देखील शुभ मानले जाते. काही प्रसंगामध्ये पैसे अचानक पडणे शुभ मानले जाते. परंतु, नाणी हातातून खाली पडणे आणि जमिनीवर विखुरणे अशुभ मानले जाते. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसल्याचे हे लक्षण आहे. अशा घटनेनंतर भविष्यात तुमचा खर्च वाढू शकतो, हे लक्षात ठेवा. पैशाबाबत या गोष्टी लक्षात ठेवा - पैसे अचानक पडणे अनेकदा शुभचिन्ह असले तरी याचा अर्थ असा नाही की आपण पैसे स्वतःच खाली टाकून द्याल. मुद्दाम पैसे टाकणे हा पैशाचा अपमान मानला जातो. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत पैशाचा नेहमी आदर आणि सन्मान केलाच पाहिजे, म्हणून खिशातून किंवा हातातून पैसे खाली पडले की लगेच खाली वाकून उचलले पाहिजे. खाली पडलेला पैसा जरी एक रुपया असला तरी तो नक्कीच आदरपूर्वक उचला. पैसा, संपत्तीचा अनादर करणे चुकीचे आहे, यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Vastu

पुढील बातम्या