मुंबई, 8 फेब्रुवारी: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा ग्रहाचा राजकुमार ग्रह मानला जातो आणि तो बुद्धिमत्ता आणि संवाद क्षमता दर्शवणारा ग्रहदेखील मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल तर ती व्यक्ती आपल्या बुद्धीचा योग्य वापर करू शकत नाही. जेव्हा बुध अशक्त असतो तेव्हा व्यक्ती नीट बोलू शकत नाही, कधी कधी तोतरेपणा सुरू होतो. हिंदू कॅलेंडरनुसार, बुध ग्रह 07 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.11 वाजता मकर राशीत प्रवेश करेल.
बुध ग्रहाच्या राशी बदलाचा प्रभाव
जेव्हा बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. मकर राशीचे लोक मेहनती आणि अत्यंत व्यावहारिक असतात. या राशीचा स्वामी शनि आहे. शनि आणि बुध हे मित्र आहेत, त्यामुळे ते एकमेकांना मदत करतात. बुध सामान्यतः खाती, बँकिंग, मोबाइल, नेटवर्किंग, संगणक आणि व्यवसाय इत्यादींशी संबंधित क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतो. कुंडलीत बुध ग्रह बलवान असेल तर व्यक्तीला या सर्व क्षेत्रात यश मिळते. जर मूळ व्यक्ती लेखक, ज्योतिषी, वृत्तपत्रकार, मीडिया प्रोफेशनल, गणितज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, विक्रेता, चित्रकार, शिल्पकार इत्यादी क्षेत्रात कार्यरत असेल तर त्याला चांगले यश मिळते.
तृतीयपंथीयाचा अपमान करू नका
बुध ग्रहाच्या संक्रमणादरम्यान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन शोध होऊ शकतात. संघर्ष करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना चांगली वाढ दिसून येईल. शेअर बाजार आणि सट्टा व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घेऊ शकाल. जर कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर त्याने चुकूनही ट्रान्सजेंडर किंवा नपुंसक यांचा अपमान करू नये.
बुध ग्रहाच्या शांतीसाठी उपाय
बुध मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा ग्रहांच्या शांतीसाठी तुम्ही ट्रान्सजेंडरचा आशीर्वाद घ्यावा. याशिवाय बुधवारी यज्ञ किंवा हवनही करावे. बुद्धदेवांना प्रसन्न करण्यासाठी बीज मंत्राचा जप करावा आणि गरीब व गरजू लोकांना अन्नदान करावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion