मराठी बातम्या /बातम्या /religion /काय करायचं, याची स्पष्टता मिळाल्यानं आशादायी वाटेल; मीन राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

काय करायचं, याची स्पष्टता मिळाल्यानं आशादायी वाटेल; मीन राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

मीन राशीचे वार्षिक राशीभविष्य

मीन राशीचे वार्षिक राशीभविष्य

नोकरी व्यतिरिक्त पैसे कमावण्याच्या इतर संधी उपलब्ध होतील. दैनंदिन कामं सोपी होण्यासाठी आधार मिळेल. तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी प्रवेश घेऊ शकता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 जानेवारी : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून मीन राशीचं 2023 या वर्षासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मीन (Pisces)

जानेवारी :

सर्वसाधारण :

तुमच्या एकूणच ऊर्जेमध्ये दृश्य बदल दिसून येईल. हा बदल सकारात्मक असेल. आळस झटकून कामाला लागाल. तुमच्याकडून एखादी मोठी कामगिरी होण्याची शक्यता आहे. इतरांच्या मताला नको तेवढी किंमत देऊ नका. घरामध्ये काही आणण्याचा घालण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आता चांगला काळ आहे.

रिलेशनशिप :

एखाद्या व्यक्तीसोबत कमिट होण्याचा विचार करत असाल, तर त्या दृष्टीने प्रयत्न करा. मैत्रीचं नातं अधिक घट्ट होईल. तुम्ही मनापासून ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिच्याबाबत तुमच्या असलेल्या योजना सत्यात उतरतील.

करिअर :

मॅनेजमेंटकडून मिळणारा संमिश्र प्रतिसाद तुम्हाला गोंधळात ठेवेल. कामाचं योग्य आऊटपुट मिळण्यासाठी आणखी वेळ लागेल. एखादा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता आकार घेऊ लागेल.

लकी रंग : Peach

फेब्रुवारी :

सर्वसाधारण :

एखादी गोष्ट करायचं ठरवलंच असेल, तर त्या दृष्टीने आतापासूनच कृती करा. ठरवलेली गोष्ट साध्य होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित अपेक्षित पाठिंबा मिळणार नाही, मात्र तुम्ही एकटेच पुरेसे आहात हेदेखील लक्षात येईल. तुमच्या मुलांसोबत अधिक वेळ व्यतीत करण्याची गरज आहे. मुलांच्या गरजा तुम्हाला स्वतःला ओळखता यायला हव्यात. कुटुंबीयांना वेळ देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्यातील नातं अधिक घट्ट होईल.

रिलेशनशिप :

काम आणि नातेसंबंध यांची सरमिसळ करू नका. आत्मपरीक्षण केल्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. छोटासा प्रवास किंवा सहल यामुळे दृष्टीकोन बदलण्यास मदत मिळेल.

करिअर :

तुमचं कौशल्य आणखी सुधारण्यासाठी एखाद्या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी कठीण प्रोजेक्ट तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त होण्याची संधी मिळवून देईल. स्पर्धा वाढू शकते.

लकी रंग : Sky Blue

मार्च :

सर्वसाधारण :

आर्थिक परिस्थिती बेताची राहील. कायदेशीर प्रकरणात भ्रमनिरास होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. एखाद्या जवळच्या मित्राकडून याबाबत प्रेरणा मिळेल. तुमचं स्टेटस उंचावण्यासाठी एखादी प्रीमियम मेंबरशिप मिळेल.

रिलेशनशिप :

नातं पुढच्या स्तरावर नेण्याची मागणी जोर धरेल. एखाद्या व्यक्तीशी कमिटेड असाल तर इतर प्रलोभनांमुळे विचलित होऊ नका. एखाद्या गेट टुगेदरमध्ये अचानक कोणीतरी व्यक्ती तुमच्या जवळ येईल.

करिअर :

नवउद्योजकांना नवीन काम तसेच संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ‘नवीन पॅकिंगमध्ये जुनाच माल’ ही स्ट्रॅटजी प्रत्येक वेळी काम करेलच असं नाही. तुमचा दृष्टीकोन आणि व्यक्त होण्याची पद्धत यामध्ये बदल केल्यास फायदा होईल.

लकी रंग : Caramel

एप्रिल :

सर्वसाधारण :

कुटुंबीयांकडून मिळालेलं एखादं सरप्राईज तुम्हाला भरपूर ऊर्जा देऊन जाईल. पुढील काही दिवस भरपूर काम करावं लागणार आहे. तुम्ही करू शकता त्याहून अधिक काम तुमच्या हातात आहे, मात्र चिकाटीने ते पूर्ण करू शकाल. एखाद्या मैत्रीपूर्ण युतीचा अनोखा प्रस्ताव समोर येईल. सध्या सुट्टीचा विचार करणं शक्य नाही.

रिलेशनशिप :

नातं तोडण्याचा विचार सध्या बाजूला ठेवा. तुम्ही या नात्याला भरपूर वेळ दिला आहे, त्यामुळे ते टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. तुम्हाला वेळोवेळी आणि अधिक स्पष्टपणे व्यक्त होण्याची गरज आहे.

करिअर :

इन्क्रिमेंट होण्याची शक्यता आहे. यामुळे काम करण्यास नवीन उत्साह मिळेल, तसंच कामाचं समाधानही लाभेल. तुमच्या वरिष्ठांशी मनमोकळेपणे गप्पा मारल्यास अडचणी दूर होतील.

लकी रंग : Plum

मे :

सर्वसाधारण :

काही दिवसांपूर्वी तुम्ही ज्या गोंधळाच्या परिस्थितीत होता, ती आता नाहीशी होईल. तुम्हाला काय करायचं आहे याबाबत स्पष्टता मिळाल्यामुळे पुन्हा आशादायी वाटेल. आर्थिक बाजू रुळावर येईल. एखादी नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. एखादी नवीन कमिटमेंट करण्यापूर्वी नीट विचार करा.

रिलेशनशिप :

दिशाहीन नातेसंबंध फार काळ टिकू शकणार नाहीत. निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे, तरीही सध्या जशास-तसं वागा. एखादा सल्ला खरोखरच फायद्याचा ठरेल.

करिअर :

भूतकाळातील मेहनतीचे परिणाम आता दिसू लागतील. स्थिरता जाणवेल. एखादी नवीन भूमिका मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने विचार करू शकता.

लकी रंग : Lemonade

जून :

सर्वसाधारण :

आश्चर्याचे धक्के बसण्याची शक्यता आहे. एखाद्या दूरच्या ठिकाणी फिरून आल्यास ताजेतवाने वाटेल. आयुष्याच्या बाबतीत जी उत्तरं तुम्ही शोधत होता, ती मिळून जातील. एखादी आनंददायी सहल नशीबात आहे. मुलांसोबत बाँडिंग वाढवण्याची चांगली संधी मिळेल. प्रकृतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. अति खाणं टाळा.

रिलेशनशिप :

एखाद्या अनोळख्या मात्र आकर्षक व्यक्तीसोबत मैत्री होईल. एखाद्या व्यक्तीबाबत साशंक असाल, तर ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी किती आणि कसे प्रयत्न करत आहे याकडे लक्ष द्या.

करिअर :

नोकरी व्यतिरिक्त पैसे कमावण्याच्या इतर संधी उपलब्ध होतील. दैनंदिन कामं सोपी होण्यासाठी आधार मिळेल. तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी प्रवेश घेऊ शकता.

लकी रंग : Hot Pink

जुलै :

सर्वसाधारण :

तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी, किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. एकाच वेळी अनेक गोष्टी मनामध्ये असतील, त्यामुळे कोणत्या गोष्टीबाबत आधी विचार करायचा याबद्दल गोंधळ उडेल. कुटुंबातील काही व्यक्तींवरचा विश्वास ढासळेल. घरी सुरू असलेल्या गोष्टींमुळे कामाचे ठिकाण अधिक शांत वाटेल. एखाद्या सेलिब्रिटीशी भेट होऊ शकेल.

रिलेशनशिप :

तुमच्या जोडीदारासोबत आता भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटणार नाही. तुमच्या आवडी-निवडींवरून वाद होऊ शकतो. एखादा ब्रेक घेणे फायद्याचे ठरेल.

करिअर :

सध्याच्या नोकरीमुळे तुमच्या मनातील योजना सत्यात उतरण्याची शक्यता आहे. काही नवीन गोष्टी समोर दिसत असल्यामुळे तुमच्या आवडीचे क्षेत्र बदलू शकते. परदेशी कामाची संधी उपलब्ध होईल.

लकी रंग : Gold

ऑगस्ट :

सर्वसाधारण :

काही वेळा कशातच रस वाटत नाही, सध्या तसंच काहीसं वाटेल. नेहमीच प्रवाहाच्या विरोधात जाणं गरजेचं नाही, हे लक्षात घ्या. सध्या भविष्यातील योजना बनवण्यावर लक्ष द्या. दैनंदिन जीवनातून एक ब्रेक घ्या, आणि त्यानंतर कामाला सुरूवात करा. भूतकाळातील एखाद्या गुंतवणुकीत छोटासा तोटा होईल. कामाच्या ठिकाणी ज्या चांगल्या बातमीची तुम्ही वाट पाहत होता, ती मिळाल्यामुळे उत्साह वाटेल.

रिलेशनशिप :

तुमच्या आवडत्या व्यक्तीबाबत संमिश्र भावना वाटतील. याबाबत तुम्ही अगदी जास्तच विचार कराल. तुमचे हृदय एक, तर मेंदू दुसरं सांगेल. अर्थात, ही भावना अधिक काळ टिकणार नाही.

करिअर :

कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या स्पर्धेतील तुमचा रस अचानक निघून जाईल. तुमच्या नवीन दृष्टीकोनाशी सहकारी कदाचित सहमत होणार नाहीत. भूतकाळातील काही मुद्दे पुन्हा वर येतील.

लकी रंग : Sepia

सप्टेंबर :

सर्वसाधारण :

इतर लोकांच्या बेपर्वा वागण्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला आता याबाबत आश्चर्य वाटणंही बंद झालं आहे. आपल्यालाच त्यांना समजण्यात अडचण येत आहे का, याबाबत आत्मपरिक्षण कराल. एखाद्या गेट टुगेदरची शक्यता आहे. दूर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुमची आठवण येत असेल. ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.

रिलेशनशिप :

तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींवर विश्वास ठेवत आला होता, त्या धक्कादायकपणे नाहीशा होतील. तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये नवीन लोकांचा समावेश होईल. गुंतागुंतीच्या गोष्टी सुटण्यासाठी वेळ लागेल.

करिअर :

प्रगती करण्याच्या तुमच्या इच्छेला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला असेल, तर पसंतीच्या ठिकाणाहून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल. या सर्व निर्णय प्रक्रियेत तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटेल.

लकी रंग : Powder Blue

ऑक्टोबर :

सर्वसाधारण :

प्रलंबित कामे संपवण्यासाठी तुम्ही आधीपासून नियोजन केले असेल. चिकाटीने प्रयत्न केल्यास सर्व कामं वेळेत पूर्ण होतील. तुम्हाला आपल्या मनातील कित्येक गोष्टी बोलून मोकळं व्हायचं आहे, मात्र त्यासाठी योग्य व्यक्ती किंवा वेळ मिळत नाहीये. कामाच्या ठिकाणी एखादे चांगले सरप्राईज मिळेल. आयुष्यात काही नवीन व्यक्ती येतील.

रिलेशनशिप :

तुम्हाला ज्या व्यक्तीकडून अपेक्षा आहे, तिच्याकडून कोणतंही उत्तर मिळणार नाही. तुमचे मन कदाचित इतर पर्यायांचा विचार करेल. आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येण्याची चिन्हं दिसतील.

करिअर :

तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने योग्य योजना आखली असती, तर आतापर्यंत ते पूर्ण झाले असते. तुमच्या मनात भीती निर्माण होईल, मात्र त्यावर लवकरच मात कराल. नवीन ऑफरमुळे आशादायी वाटेल.

लकी रंग : Raspberry

हे वाचा -  मिळालेली संधी सोडायची नसेल तर कामाला लागा; कुंभ राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

नोव्हेंबर :

सर्वसाधारण :

नवीन सुरू केलेल्या गोष्टी आता दैनंदिन जीवनाचा भाग होतील. मागील सर्व प्रयत्न आता अधिक पॉलिश झालेले दिसतील. भूतकाळात मोठ्या प्रमाणात झालेल्या बदलांनंतर आता गोष्टी हळूहळू स्थिरावताना दिसतील. एखादी व्यक्ती तुमच्या गुणांचे कौतुक करेल, ज्यांचा कामाच्या ठिकाणी वापर होऊ शकतो. जर तुम्ही कॅमेऱ्यासमोर जायला लाजत नसाल, तर व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःला सादर करण्याचा विचार करू शकता.

रिलेशनशिप :

समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची तुमची समज सुधारली आहे, आणि सोबतच त्या व्यक्तीकडून असलेल्या तुमच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. केवळ तुम्हीच तुमच्या जोडीदाराचे मूल्यमापन करत आहात असं नाही. या महिन्यात नात्यांमध्ये स्थैर्य आणि शांतता जाणवेल.

करिअर :

तुमची शॉर्ट टर्म ध्येये आता साध्य होतील. इच्छित परिणाम मिळवण्यासाठी छोटासा सल्ला फायद्याचा ठरेल. तुमची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुन्हा शिक्षणाचा विचार करत असाल तर ते योग्य ठरेल.

लकी रंग : Jungle

डिसेंबर :

सर्वसाधारण :

आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे कट रचला जात असण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला जवळचा मित्र समजत होता, ती व्यक्ती त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी अद्याप तयार नसेल. मेडिटेशन करणे गरजेचे आहे.

रिलेशनशिप :

औपचारिक युती करण्यासाठी आधी योग्य रिसर्च करणे फायद्याचे ठरेल. लग्नाचा विचार करत असाल, तर पुढील वर्षीच्या सुरूवातीला योग्य संधी आहे. तुमची सकारात्मक विचारसरणी चर्चेचा विषय बनू शकते.

करिअर :

कामाशी संबंधित प्रवासाचा विचार करत असाल, तर तशी संधी उपलब्ध होईल. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. हातातील काम पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज भासेल. वाढीव अपेक्षा पूर्ण करणं अवघड ठरेल.

लकी रंग : Mocha

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Rashibhavishya