मराठी बातम्या /बातम्या /religion /मत्स्य जयंतीला या गोष्टी करा; महाविष्णूच्या दशावतारातील पहिल्या अवताराची आज पूजा

मत्स्य जयंतीला या गोष्टी करा; महाविष्णूच्या दशावतारातील पहिल्या अवताराची आज पूजा

मत्स जयंतीची पूजा

मत्स जयंतीची पूजा

Matsya Jayanti 2023: भगवान विष्णूच्या महाकाय मत्स्यरूपाबद्दलच्या धार्मिक आणि पौराणिक कथेनुसार, प्रलयाच्या संकटापासून विश्वाला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंना माशाचे रूप धारण करावे लागले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 मार्च : मत्स्य जयंती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या मत्स अवताराची पूजा करण्याची परंपरा आहे. मत्स्य अवतार हा महाविष्णूच्या दशावतारातील पहिला अवतार आहे. या रूपात प्रकट होऊन श्री हरीने प्रलयापासून विश्वाचे रक्षण केले आणि वेदांना पुन:प्राप्त केले.

यावर्षीची मत्स्य जयंती आज शुक्रवारी, 24 एप्रिल 2023 रोजी आहे. या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4.15 पर्यंतचा काळ पूजेसाठी शुभ राहील. मत्स्य जयंतीला भक्तिभावाने पूजा केल्यानं भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते. यासोबत मत्स्य जयंतीच्या दिवशी करावयाची काही विशेष कामे सांगितली आहेत. ही कामे केल्याने देव प्रसन्न होतो.

भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार का घेतला?

भगवान विष्णूने सर्व अवतार विश्वाच्या कल्याणासाठी घेतले. तसेच माशाच्या रूपात भगवंताचा अवतारही जगाच्या कल्याणासाठीच होता. भगवान विष्णूच्या महाकाय मत्स्यरूपाबद्दलच्या धार्मिक आणि पौराणिक कथेनुसार, प्रलयाच्या संकटापासून विश्वाला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंना माशाचे रूप धारण करावे लागले. या अवतारात देवाने वेदांचेही रक्षण केले. पौराणिक कथेनुसार, कश्यप आणि दिती यांच्या राक्षसी पुत्राने वेद समुद्रात अति खोलवर लपवले. तेव्हा भगवान विष्णूंनी माशाचे रूप धारण करून त्याच्याशी युद्ध केले आणि वेद परत मिळवून ब्रह्माच्या, महर्षी वेद व्यासांच्या स्वाधीन केले.

मत्स्य जयंतीला हे कार्य अवश्य करावे -

मत्स्य जयंतीच्या दिवशी शास्त्रानुसार भगवान विष्णूची पूजा करण्याबरोबरच या दिवशी माशांना खाऊ घालावे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. मत्स्य जयंतीच्या दिवशी जी व्यक्ती पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालते, भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद प्राप्त करतात, अशी श्रद्धा आहे.

मत्स्य जयंतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. या दिवशी नदीत स्नान केल्यानं शरीर आणि मन शुद्ध होते. जर कोणत्याही कारणाने नदीत स्नान शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करता येते.

मत्स्य जयंतीला गरीब, गरजू आणि ब्राह्मणांना सात प्रकारच्या धान्यांचे दान करावे. तसेच या दिवशी मंदिरात हरिवंशपुराण दान केल्याने पुण्य मिळते, असे मानले जाते.

मत्स्य जयंतीच्या दिवशी पद्धतशीरपणे देवाची पूजा करा आणि पूजेत भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराशी संबंधित कथा जरूर वाचा. यासोबत मत्स्य जयंतीला 'ओम मत्स्यरूपाय नमः' या मंत्राचा जप करावा.

हे वाचा - बापरे..! शुक्र आणि राहू आलेत एकत्र, या राशीच्या लोकांचा ऐन पाडव्याला शिमगा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Navratri, Religion