मराठी बातम्या /बातम्या /religion /

Masik Shivratri 2022: आज भाद्रपद शिवरात्रीला करा हे 7 सोपे उपाय; मिळेल धन-धान्य, समृद्धी

Masik Shivratri 2022: आज भाद्रपद शिवरात्रीला करा हे 7 सोपे उपाय; मिळेल धन-धान्य, समृद्धी

आज भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरपूर देणारे देव आहेत.

आज भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरपूर देणारे देव आहेत.

आज भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरपूर देणारे देव आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 ऑगस्ट : भाद्रपद महिन्यातील मासिक शिवरात्री आज 25 ऑगस्ट गुरुवारी आहे. आज भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरपूर देणारे देव आहेत. ते मनाचे विकार, दु:ख, दारिद्र्य, अकाली मृत्यूची भीती, ग्रहदोष दूर करून पुत्र, धन, संपत्ती, सुख, समृद्धी इत्यादी प्रदान करणार आहेत. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट काही सोप्या उपायांबद्दल सांगत आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता.

भाद्रपद शिवरात्री कधीपासून

भाद्रपद कृष्ण चतुर्थी तिथी: 25 ऑगस्ट, सकाळी 10:37 ते 26 ऑगस्ट, दुपारी 12:23

पूजा मुहूर्त: दुपारी 12:01 ते 12:45 पर्यंत

सर्वार्थ सिद्धी योग: सकाळी 05:55 ते दुपारी 04:16 पर्यंत

शिवरात्रीचे उपाय

1. जे निपुत्रिक आहेत, अशा लोकांनी या दिवशी पिठाच्या शिवलिंगाची पूजा करावी. त्यांनी किमान 11 शिवलिंग बनवावेत आणि त्या सर्वांचा 11 वेळा गंगाजलाने अभिषेक करावा. नीट पूजा करावी. असे केल्याने संतती योग तयार होतो.

2. शिवरात्रीच्या दिवशी 21 बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि ओम नमः शिवाय मंत्राच्या जपाने शिवाला अर्पण करा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात.

3. जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा, धान्य, सुख आणि समृद्धी हवी असेल तर शिवरात्रीच्या दिवशी शिवजींना जव (बार्ली) अर्पण करा. बार्ली हे पवित्र धान्य मानले जाते.

4. जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र, चंदन, फुले, फळे, धूप, दिवे इत्यादींनी पूजा करावी.

5. जर तणाव असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर शिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करा आणि त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. तुम्हाला शांती मिळेल.

6. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकट येत असेल तर शिवरात्रीला पती-पत्नीने मिळून शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

7. ज्या लोकांचे कोणत्याही कारणाने लग्न जमू शकत नाहीत, त्यांनी शिवरात्रीला गायीच्या दुधात केशर मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. सकारात्मक परिणाम लवकरच दिसू शकतात.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion