मराठी बातम्या /बातम्या /religion /

मार्गशीर्ष सुरू होताच लगेच आहे विनायक चतुर्थी; पाहा पूजा मुहूर्त, चंद्रोदय, धार्मिक महत्त्व

मार्गशीर्ष सुरू होताच लगेच आहे विनायक चतुर्थी; पाहा पूजा मुहूर्त, चंद्रोदय, धार्मिक महत्त्व

मार्गशीर्ष विनायक चतुर्थी

मार्गशीर्ष विनायक चतुर्थी

जे 27 नोव्हेंबर रोजी विनायक चतुर्थी व्रत करतात, त्यांनी सकाळी 11.06 ते दुपारी 01.12 या वेळेत गणेशाची पूजा करावी. विनायक चतुर्थी पूजेचा हा शुभ मुहूर्त आहे. तसेच...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 23 नोव्हेंबर : विनायक चतुर्थी व्रत मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. या दिवशी दुपारपर्यंत गणेशाची पूजा करून उपवास ठेवतात. या व्रतामध्ये चंद्र दिसणे अशुभ मानले जाते कारण त्यामुळे खोटा कलंक लागतो. चतुर्थीचे व्रत केल्यास गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी मार्गशीर्ष विनायक चतुर्थीची तारीख, पूजा मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ सांगितली आहे.

मार्गशीर्ष विनायक चतुर्थी 2022

पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी 07:28 वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी 27 नोव्हेंबर रविवार संध्याकाळी 04:25 पर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या आधारे 27 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे.

विनायक चतुर्थी 2022 पूजा मुहूर्त

जे 27 नोव्हेंबर रोजी विनायक चतुर्थी व्रत करतात, त्यांनी सकाळी 11.06 ते दुपारी 01.12 या वेळेत गणेशाची पूजा करावी. विनायक चतुर्थी पूजेचा हा शुभ मुहूर्त आहे.

विनायक चतुर्थीला दोन शुभ योग

विनायक चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे दोन शुभ योग तयार होत आहेत. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:53 पासून रवि योग सुरू होत असून तो दुपारी 12:38 पर्यंत आहे. दुसरीकडे, सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 12:38 ते दुसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:54 पर्यंत आहे. हे दोन्ही योग चांगल्या कार्यासाठी शुभ आहेत.

विनायक चतुर्थी 2022 चंद्रोदयाची वेळ

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी 10:28 वाजता चंद्र उगवेल आणि रात्री 08:49 वाजता चंद्रास्त होईल. या व्रतामध्ये चंद्रदर्शन निषिद्ध आहे. यामुळे तुम्हाला चंद्रोदयाची वेळ अगोदर सांगितली जात आहे जेणेकरून तुम्ही त्या दिवशी तुमची पूजा वेळेवर करू शकता आणि चंद्र पाहणार नाहीत.

विनायक चतुर्थी व्रताचे महत्त्व

विनायक चतुर्थीचे व्रत आणि गणेशाची आराधना केल्याने घरात सुख, समृद्धी आणि मंगल वाढते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कामातील अडचणी दूर होतात, संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion