मराठी बातम्या /बातम्या /religion /

Amavasya Vrat Katha: सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी दर्श अमावस्येला वाचावी/ऐकावी ही कथा

Amavasya Vrat Katha: सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी दर्श अमावस्येला वाचावी/ऐकावी ही कथा

Amavasya Vrat Katha: पूजेच्या वेळी अमावस्या व्रताची कथा ऐकल्याने अखंड सौभाग्य आणि सुख प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी अमावस्येच्या व्रताची कथा सांगितली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 22 नोव्हेंबर : कार्तिक महिन्यातील अमावस्या बुधवारी, 23 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पवित्र स्नान, दान, व्रत आणि पूजा केल्याने पुण्य लाभते. पूजेच्या वेळी अमावस्या व्रताची कथा ऐकल्याने अखंड सौभाग्य आणि सुख प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी अमावस्येच्या व्रताची कथा सांगितली आहे.

अमावस्या व्रत कथा

एका शहरात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्याच्या घरी एक मुलगी होती, जी खूप सुंदर होती पण तिचे लग्न होत नव्हते. एके दिवशी एक साधू तिच्या घरी आले आणि त्या मुलीच्या सेवेने प्रसन्न झाले त्यावेळी त्यांनी तिचा हात पाहिला. त्यावर त्यांनी सांगितले की, हिच्या हातावर लग्नाची रेषा नाही.

साधूने सांगितले की, गावात सोना धोबीन आहे. जर या मुलीने तिची सेवा केली आणि तिने आपल्या इच्छेने मुलीचे लग्न व्हावे म्हणून तिला कुंकू लावले तर मुलीचे वैधव्य निघून जाईल. तेव्हा ब्राह्मण पित्याने मुलीला त्या धोबीनीची सेवा करण्यास सांगितले.

वडिलांच्या म्हणण्यानुसार, ती मुलगी रोज सकाळी सोना धोबीच्या घरी जायची आणि घरातील सर्व कामे करून घरी परत यायची. सोना धोबीनीने आपल्या सुनेला विचारले की, आजकाल तू घरची कामे फार लवकर करते, कधी काम करतेस ते कळतही नाही. तेव्हा ती म्हणाली की, यातील काहीच काम मी करत नाही. या सगळ्या गोष्टी कोण करतं ते माहीत नाही.

सासू आणि सुनेने दुसऱ्या दिवसापासून निरीक्षण सुरू केले. बर्‍याच दिवसांनी सोना धोबीने त्या मुलीला पकडून विचारले की इतके दिवस तू माझ्या घरी हे सगळे का करत आहेस? मग तिनं सोना धोबीनीला सगळं सांगितलं. मग त्यांनी तिला असे करण्याची परवानगी दिली.

सोना धोबीनीने मुलीच्या म्हणण्यानुसार कुंकू लावताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यावर ब्राह्मण कुटुंबाच्या घरातून परतत असताना सोना धोबीनीने वाटेत असलेल्या पिंपळाच्या झाडाला 108 विटांची भंवरी दिली आणि 108 वेळा प्रदक्षिणा घातली आणि मगच पाणी प्यायली. त्या दिवशी ती सकाळपासून पाणी न पिता उपवास करत होती. पिंपळाची परिक्रमा करताच तिचा नवरा जिवंत झाला, अशी अख्यायिका आहे. त्या दिवशी दर्श सोमवती अमावस्या होती. धार्मिक मान्यतेनुसार जी स्त्री दर्श अमावस्येपासून भंवरी देण्याची परंपरा सुरू करते आणि दर अमावास्येला भंवरी अर्पण करते. तिचे सुख आणि सौभाग्य वाढते, असे मानले जाते.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu