मुंबई, 01 एप्रिल : जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर. महावीरांच्या आधी जैन धर्माचे 23 तीर्थंकर होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात. जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते. प्रमुख दिनदर्शिकांवर दिल्याप्रमाणे महावीर जयंती यावेळी दोन दिवस साजरी केली जाणार आहे.
याचे कारण म्हणजे - चैत्र शु. 13 या दिवशी श्री महावीर जयंती साजरी केली जाते. रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी द्वादशी (शु.12) असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे.
ज्या ठिकाणी सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून 24 मिनिटांपूर्वी सूर्योदय होतो, त्या ठिकाणी दिनांक 3 रोजी द्वादशीची वृद्धी होते व मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी त्रयोदशी येत असून त्याच दिवशी श्री महावीर जयंती आहे. मात्र, ज्या ठिकाणी सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून 24 मिनिटानंतर सूर्योदय होत असेल त्या ठिकाणी त्रयोदशीची वृद्धी होऊन सोमवार दिनांक 3 व मंगळवार दिनांक 4 या दोन्ही दिवशी त्रयोदशी येते म्हणून या ठिकाणी सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी त्रयोदशी अहोरात्र येत असताना श्री महावीर जयंती आहे.
हे वाचा - मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब
सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी श्री महावीर जयंती असलेली ठिकाणे - मुंबई, संपूर्ण कोकण, पुणे, नाशिक, शिर्डी, संगमनेर, मालेगाव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, संपूर्ण गोवा, गुजरात, बेळगाव, गोकाक कारवार मंगळूर इत्यादी.
हे वाचा - हनुमानाला का म्हटलं जातं 'अष्टसिद्धी के दाता'; कोणत्या आहेत त्या आठ सिद्धी?
मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी श्री महावीर जयंती असलेली ठिकाणे - सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, सगळा मराठवाडा व विदर्भ, हुबळी, धारवाड, विजापूर, कलबुर्गी, बागलकोट, म्हैसूर बेंगलोर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.