मराठी बातम्या /बातम्या /religion /29 मार्चला महाअष्टमी, महागौरीच्या पूजेचा शुभ मुहूर्त, पद्धत, नैवद्याविषयी

29 मार्चला महाअष्टमी, महागौरीच्या पूजेचा शुभ मुहूर्त, पद्धत, नैवद्याविषयी

शास्त्रानुसार महागौरीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

शास्त्रानुसार महागौरीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

शास्त्रानुसार महागौरीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च: सध्या चैत्र नवरात्री सुरू आहे. बुधवारी, 29 मार्च 2023 रोजी चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस आहे. चैत्र नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी दुर्गेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक कन्यकांची पूजा करतात. शास्त्रानुसार महागौरीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.

महागौरीचे आवडते नैवेद्य-

देवी भागवत पुराणानुसार नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीला नारळ अर्पण करावा. भोग अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून वाटप करावा.

महागौरी पूजेचा शुभ मुहूर्त-

ब्रह्म मुहूर्त- पहाटे 04:42 ते 05:29 पर्यंत.

विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते दुपारी 03:19

गोधुली मुहूर्त - संध्याकाळी 06:36 ते संध्याकाळी 06:59.

अमृत ​​काळ- सकाळी 09:02 ते सकाळी 10:49

कोणत्या रंगाचे कपडे घालावे

महागौरीची पूजा करताना गुलाबी रंगाचे कपडे घालावेत.

महागौरी पूजा पद्धती

सकाळी लवकर उठून स्नान आदी आटोपून स्वच्छ कपडे परिधान करावेत.

मातेच्या मूर्तीला गंगेच्या पाण्याने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे.

देवीला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. धार्मिक मान्यतेनुसार महागौरीला पांढरा रंग प्रिय आहे.

देवीच्या स्नानानंतर पांढरे फूल अर्पण करावे.

देवी कुमकुम लावावे.

यानंतर मिठाई, काजू, फळे अर्पण करा.

महागौरीला काळे हरभरे अवश्य अर्पण करा.

महागौरीचे एकाग्र चित्ताने ध्यान नक्की करा.

यानंतर देवीची आरतीही करावी.

अष्टमीच्या दिवशी मुलींच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी मुलींचीही पूजा करा.

महागौरी मंत्र

या देवी सर्वभू‍तेषु माँ गौरी रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

ध्यान मंत्र

वन्दे वांछित कामार्थेचन्द्रार्घकृतशेखराम्।

सिंहारूढाचतुर्भुजामहागौरीयशस्वीनीम्॥

पुणेन्दुनिभांगौरी सोमवक्रस्थितांअष्टम दुर्गा त्रिनेत्रम।

वराभीतिकरांत्रिशूल ढमरूधरांमहागौरींभजेम्॥

पटाम्बरपरिधानामृदुहास्यानानालंकारभूषिताम्।

मंजीर, कार, केयूर, किंकिणिरत्न कुण्डल मण्डिताम्॥

प्रफुल्ल वदनांपल्लवाधरांकांत कपोलांचैवोक्यमोहनीम्।

कमनीयांलावण्यांमृणालांचंदन गन्ध लिप्ताम्॥

स्तोत्र मंत्र

सर्वसंकट हंत्रीत्वंहिधन ऐश्वर्य प्रदायनीम्।

ज्ञानदाचतुर्वेदमयी,महागौरीप्रणमाम्यहम्॥

सुख शांति दात्री, धन धान्य प्रदायनीम्।

डमरूवाघप्रिया अघा महागौरीप्रणमाम्यहम्॥

त्रैलोक्यमंगलात्वंहितापत्रयप्रणमाम्यहम्।

वरदाचैतन्यमयीमहागौरीप्रणमाम्यहम्॥

कवच मंत्र

ओंकार: पातुशीर्षोमां, हीं बीजंमां हृदयो।

क्लींबीजंसदापातुनभोगृहोचपादयो॥

ललाट कर्णो,हूं, बीजंपात महागौरीमां नेत्र घ्राणों।

कपोल चिबुकोफट् पातुस्वाहा मां सर्ववदनो॥

महागौरी पूर्ण करते इच्छा

महागौरीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. भक्ताला त्याच्या आवडत्या जीवनसाथीचा सहवास मिळतो. पापांपासून मुक्ती मिळते. सुख-समृद्धीसोबतच व्यक्तीला आशीर्वादही मिळतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Navratri, Rashibhavishya, Rashichakra, Religion