मराठी बातम्या /बातम्या /religion /30 वर्षांनंतर महाशिवरात्रीला घडतोय हा दुर्मिळ योगायोग! अशी करा महादेवाची पवित्र पूजा

30 वर्षांनंतर महाशिवरात्रीला घडतोय हा दुर्मिळ योगायोग! अशी करा महादेवाची पवित्र पूजा

महाशिवरात्रीची पूजा कशी करावी

महाशिवरात्रीची पूजा कशी करावी

ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी महाशिवरात्रीला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. ज्योतिषांच्या मते 30 वर्षांनंतर या वेळी महाशिवरात्रीला काही विशेष योग जुळून आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला देशभरात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे भक्त महाशिवरात्रीचे व्रत पाळतात आणि भोले शंकर-माता पार्वतीची पूजा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी महाशिवरात्रीला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. ज्योतिषांच्या मते 30 वर्षांनंतर या वेळी महाशिवरात्रीला अनेक विशेष योग जुळत आहेत. या दिवशी शिवमंदिरात पूजन केल्याने इच्छित फळ प्राप्त होते.

ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम सांगतात की यावेळी महाशिवरात्री शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी येत आहे, हा एक दैवी आणि दुर्मिळ योगायोग असलेला एक शुभ दिवस आहे. दुसरीकडे, महाशिवरात्रीच्या दिवशी शनिदेव कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. या महाशिवरात्रीच्या काळात त्या दिवशी शनि आणि सूर्य म्हणजेच पिता-पुत्र एकत्र येतात. याशिवाय शुक्र देखील आपल्या गृहात उच्च राशीत असेल. याशिवाय प्रदोष काल देखील त्याच दिवशी आहे. 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री आठ वाजता महाशिवरात्रीचा उत्सव सुरू होईल, जो 19 फेब्रुवारीला सायंकाळी 4:20 वाजेपर्यंत राहील.

यंदा दुर्मिळ योगात आलेली महाशिवरात्री भगवान भोलेनाथाची पूजा करणाऱ्यांसाठी परम हितकारक आणि शुभ ठरणार आहे.

ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करा. बेलपत्रावर रामाचे नाव लिहून प्रतिष्ठित शिवालयात अर्पण करावे. यासोबतच भगवान शिवाच्या मंत्रांचाही जप करा.

या मंत्रांचा जप करा

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि

तन्नो रुद्रः प्रचोदयात्!

ॐ नमो भगवते रुद्राय नमः

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

महादेवाची कृपा मिळविण्यासाठी या मंत्रांचा जप करा

ओम नमः शिवाय

महाशिवरात्रीची पूजा अशी करा -

महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून ध्यान करा आणि तुमच्या जवळच्या शिवालयात जाऊन भगवान भोलेनाथ शंकराला जल अर्पण करा. बेलपत्र, इत्यादी अर्पण करा. महाशिवरात्रीच्या उपवासात मातीच्या भांड्यात पाणी किंवा दूध भरून त्यात बेलपत्र, आक-धतुरा, तांदूळ इत्यादी टाकून शिवलिंगाला अर्पण करावे. तुम्हाला मंदिरात जाता येत नसेल तर घरी मातीचे पार्थिव शिवलिंग बनवून शंकराची पूजा करा आणि त्यावर जल अर्पण करा.

हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Mahashivratri 2023, Religion, Vastu