मराठी बातम्या /बातम्या /religion /माघ पौर्णिमेच्या दिवशी अशा गोष्टी हातून घडू नयेत; देवी लक्ष्मी-विष्णूची होईल अवकृपा

माघ पौर्णिमेच्या दिवशी अशा गोष्टी हातून घडू नयेत; देवी लक्ष्मी-विष्णूची होईल अवकृपा

माघ पौर्णिमा

माघ पौर्णिमा

Magh Purnima 2023: लक्ष्मीची आठ रूपे आहेत, ज्यांना अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. ज्याच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा असते, त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. पण, जर माता लक्ष्मी एखाद्या नाराज झाली तर त्या व्यक्तीचे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 फेब्रुवारी : माघ पौर्णिमेचा दिवस नशीब आणि आर्थिक बाजू मजबूत करण्याची मोठी संधी आहे. 05 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेला स्नान करून दान करावे. यंदाच्या माघ पौर्णिमेला रविपुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योगासह चार शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी पूजा, मंत्रजप, दान, स्नान केल्याने पुण्य लाभते आणि देव-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते. तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्या मते, पौर्णिमेला पूजा-विधी केल्यानं माता लक्ष्मी आणि चंद्राच्या आशीर्वादाने भाग्याचा विजय होईल आणि धनाची प्राप्ती होईल. कामात यश मिळेल. लक्ष्मीची आठ रूपे आहेत, ज्यांना अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. ज्याच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा असते, त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. पण, जर माता लक्ष्मी एखाद्या नाराज झाली तर त्या व्यक्तीचे धन, वैभव, समृद्धी सर्वकाही निघून जातं. माघ पौर्णिमेच्या दिवशी काही कामे करणे टाळावे.

माघ पौर्णिमा 2023 रोजी काय करू नये -

1. माघ पौर्णिमेच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान करावे नंतर दक्षिणा दान करा. सूर्योदयानंतर उशिरा झोपल्याने अशुभता वाढते.

2. माघ पौर्णिमेला स्नान न करणे देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेपासून दूर राहण्यासारखे आहे. गंगा किंवा तीर्थात स्नान करता येत नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकून स्नान करावे.

3. या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच भगवान विष्णूलाही प्रसन्न ठेवावे. माघ पौर्णिमेला तुमच्या कोणत्याही कार्याने भगवान विष्णू किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तूंचा अनादर करू नका. असं केल्यानं तुम्हाला लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार नाही.

4. माघ पौर्णिमेच्या दिवशी केळी, तुळस, आवळा, पिंपळ, हरसिंगार इत्यादी झाडांना कोणत्याही प्रकारे इजा करू नये. त्याचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी आहे.

5. माघ पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही दिवशी गायीला मारू नका किंवा तिचा अनादर करू नका. गायीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, तिच्यामध्ये सर्व देवी-देवता वास करतात, असे सांगितले जाते. या दिवशी गोवंशाची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होते.

6. या दिवशी मांस, लसूण, कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन टाळावे.

माघ पौर्णिमा -

या वर्षी माघ पौर्णिमा शनिवार, 04 फेब्रुवारी रोजी रात्री 09:29 पासून सुरू होईल आणि 05 फेब्रुवारी रोजी रात्री 11:58 वाजता समाप्त होईल. या दिवशी तुम्ही सूर्योदयानंतर स्नान आणि दान करू शकता.

हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu