मराठी बातम्या /बातम्या /religion /चैत्र नवरात्रीच्या काळात घरी आणाव्या या फेंगशुई वस्तू; कुटुंबाला लाभते सुख-समृद्धी, प्रगती

चैत्र नवरात्रीच्या काळात घरी आणाव्या या फेंगशुई वस्तू; कुटुंबाला लाभते सुख-समृद्धी, प्रगती

चैत्र नवरात्रीतील फेंगशुई टिप्स

चैत्र नवरात्रीतील फेंगशुई टिप्स

Chaitra Navratri 2023 Fengshui Tisp : नशीबाची चांगली साथ हवी असेल तर नवरात्री संपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सुख-समृद्धीशी संबंधित या गोष्टी आणून त्याचा लाभ घेऊ शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च : दिनांक 22 मार्च 2023 पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. ज्याची समाप्ती 30 मार्च 2023 रोजी नवमीला होईल. सनातन धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. फेंगशुईनुसार, या काळात फेंगशुईशी संबंधित अनेक गोष्टी घरात आणल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि प्रगती लाभू शकते. नशीबाची चांगली साथ हवी असेल तर नवरात्री संपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सुख-समृद्धीशी संबंधित या गोष्टी आणून त्याचा लाभ घेऊ शकता. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत ​​आहेत.

1. लाफिंग बुद्ध -

फेंगशुईनुसार, लाफिंग बुद्ध घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्याच्या प्रभावानं सकारात्मक ऊर्जा आणि शुभेच्छा घरात आकर्षित होतात. चिनी वास्तुशास्त्रानुसार, लाफिंग बुद्धाला अशा ठिकाणी ठेवणे शुभ असते, जिथे तुम्ही घरात प्रवेश करताच तुमची नजर सर्वात आधी त्याच्यावर पडेल.

2. चिनी नाणं -

चिनी वास्तुशास्त्रानुसार तीन चिनी नाणी बांधलेला धागा घरात आणणे खूप शुभ असते. ती नाणी लाल रंगाच्या रिबनमध्ये बांधून दाराच्या हँडलवर टांगणे फायदेशीर मानले जाते. यामुळे कोणतीही आर्थिक समस्या येत नाही, असे मानले जाते.

3. मत्स्यालय (फिश एक्वॅरियम) -

चिनी वास्तुशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीच्या काळात घरात फिश एक्वॅरियम आणणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि व्यक्तीची त्याच्या क्षेत्रात प्रगती होते.

4. फेंगशुई कासव -

चायनीज वास्तुशास्त्र म्हणजेच फेंगशुईनुसार घरात फेंगशुई कासव असणे हे सकारात्मक उर्जा आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये फेंगशुई कासव ठेवले तर त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढते आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते.

हे वाचा - दारात तुळस असेल तर चैत्र नवरात्रीत करा हे काम; कुटुंबावर राहील जगदंबेची कृपा

5. फेंगशुई बांबूचे झाड -

चिनी वास्तुशास्त्रानुसार, चैत्र नवरात्रीच्या काळात घरामध्ये बांबूचे रोपटे आणणे खूप शुभ मानले जाते. बांबूच्या झाडाच्या मदतीने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतरित होते. हे झाड ऑफिसमध्ये किंवा घराच्या ड्रॉईंग रूममध्ये ठेवून तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.

6. विंड चाइम्स

चिनी वास्तुशास्त्रानुसार घरात विंड चाइम लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा विंड चाइम्सची घंटा एकमेकांवर आदळते तेव्हा त्यातून निघणारा आवाज तेथील वातावरण सकारात्मक बनवतो. ज्यामुळे मानसिक शांती मिळते.

हे वाचा - सर्व शुभ कामांसाठी खास आहे नवरात्री, तरीही या 9 दिवसांत का होत नाही लग्न?

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Religion, Vastu