मराठी बातम्या /बातम्या /religion /

Peacock In Dream: स्वप्नात असा मोर दिसला तर समजून घ्या चंगळ आहे; शुभ संकेत असतात ते

Peacock In Dream: स्वप्नात असा मोर दिसला तर समजून घ्या चंगळ आहे; शुभ संकेत असतात ते

अनेक वेळा लोकांना स्वप्नात मोर दिसतो. स्वप्नात मोर दिसणे शुभ मानले जाते, परंतु ते त्या मोराच्या आकारावर आणि रंगावरही अवलंबून असते. मोराच्या स्वप्नाविषयी काही गोष्टी जाणून घेऊ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 ऑगस्ट : प्रत्येकाला स्वप्ने पडत असतात. चांगली आणि वाईट अशी अनेक प्रकारची स्वप्ने आपल्याला दिसतात. माणसाच्या आयुष्यात या स्वप्नांचे विशेष महत्त्व असते. स्वप्नशास्त्रात स्वप्नांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. असे मानले जाते की प्रत्येक स्वप्न एखाद्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगले किंवा वाईट घडण्याचे सूचित असते, म्हणून स्वप्नांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अनेक वेळा लोकांना स्वप्नात मोर दिसतो. स्वप्नात मोर दिसणे शुभ मानले जाते, परंतु ते त्या मोराच्या आकारावर आणि रंगावर अवलंबून असते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी स्वप्नात कोणत्या प्रकारचे मोर दिसणे शुभ चिन्ह मानले जाते, याविषयी (Peacock In Dream) सांगितले आहे.

नाचणारा मोर दिसणे शुभ -

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, जर स्वप्नात नाचणारा मोर दिसला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. हे स्वप्न तुमच्यासाठी चांगले आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, जीवनात सुरू असलेले त्रास हळूहळू संपत जातील. त्याच वेळी, हे स्वप्न आपल्याला भविष्यासाठी सतर्क राहण्याचे संकेत देखील देते.

मोराची जोडी पाहणे शुभ असते -

जर स्वप्नात मोर आणि लांडोर अशी जोडी दिसली तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, असे स्वप्न वैवाहिक जीवन मजबूत करते आणि खूप चांगली बातमी मिळण्याचे संकेत असतात.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

काळ्या रंगाचा मोर अशुभ

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काळा मोर पाहणे आणि बसलेल्या स्थितीत मोर दिसणे शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की काळा मोर सूचित करतो की आगामी काळात तुमच्यासोबत काही मोठी दुर्घटना घडू शकते आणि कोणत्याही तुमच्या गोष्टीबद्दल अफवा पसरवल्या जाऊ शकतात. अशावेळी आपण सावध असले पाहिजे.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion