मराठी बातम्या /बातम्या /religion /घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी या टिप्स, जाणून घ्या महत्त्वाचे वास्तू नियम

घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी या टिप्स, जाणून घ्या महत्त्वाचे वास्तू नियम

महत्त्वाचे वास्तू नियम

महत्त्वाचे वास्तू नियम

प्रत्येक वस्तूसाठी काही ना काही दिशा ठरवून दिली आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च: आजच्या काळात प्रत्येकाचे एक स्वप्न असते की त्याचे स्वतःचे घर असेल जे तो त्याच्या इच्छेनुसार सजवू शकेल. अनेक वेळा हे स्वप्न सत्यात उतरते, पण त्यानंतर अनेक अनेक समस्याही सुरू होतात. वास्तुशास्त्रानुसार, याचे मुख्य कारण घरात असलेल्या वस्तू आणि त्यांची दिशादेखील असू शकते. प्रत्येक वस्तूसाठी काही ना काही दिशा ठरवून दिली आहे, जी व्यवस्थित ठेवल्यास त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर आणि मनावर चांगला परिणाम होतो. जाणून घ्या अशाच काही वास्तु टिप्स, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येईल.

देवघराची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, घरात एक खोली किंवा कोपरा असा असावा जो प्रार्थना किंवा ध्यानासाठी पूर्णपणे समर्पित असेल. म्हणूनच घरात पूजेसाठी जागा असलीच पाहिजे. फक्त पूजा घरासाठी ईशान्य कोपरा निवडा हे लक्षात ठेवा. यासोबतच हे स्थळ बाथरूमजवळ अजिबात नसावे.

पाण्याच्या टाकीची दिशा

घरात पाणी साठवण्यासाठी एक निश्चित जागा असणे आवश्यक आहे. घरामध्ये वास्तुदोष होऊ नयेत असे वाटत असेल तर घराच्या उत्तर दिशेला पाण्याची टाकी ठेवावी. यासोबतच त्याची नियमित स्वच्छता करत राहा.

बेडरूममध्ये शोपीस

बेडरुममध्ये कधीही पाण्याचे कारंजे शोपीस म्हणून किंवा त्याचे चित्रही असू नये. यामुळे परस्पर संबंध बिघडतात.

घरात असावा हा रंग

तुमचे घर रंगवताना, हे लक्षात ठेवा की यामुळे अधिक सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही तुमचे घर पांढरे, हिरवे आणि आकाशी निळे अशा नैसर्गिक रंगात रंगवू शकता. यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल. दुसरीकडे, ज्यांना आशावादी बनायचे आहे ते घरी पिवळे आणि केशरीदेखील करू शकतात.

या दिशेने असावे प्रवेशद्वार

प्रत्येक व्यक्तीला हे चांगलेच माहीत असते की घराचा मुख्य दरवाजा हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. म्हणूनच तो वास्तुनुसार असावा. असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. त्यामुळे प्रवेशद्वारासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर किंवा पूर्व आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion