Shukrawar Lakshmi Puja: लक्ष्मीची पूजा करताना म्हणून कवड्या वापरतात; शुक्रवारच्या पूजेत या गोष्टी घ्या

Shukrawar Lakshmi Puja: लक्ष्मीची पूजा करताना म्हणून कवड्या वापरतात; शुक्रवारच्या पूजेत या गोष्टी घ्या

लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कवड्यांना खूप महत्त्व आहे. माता लक्ष्मी ज्याप्रमाणे समुद्रातून प्रकट झाली, त्याचप्रमाणे कवड्यादेखील समुद्रातील एका प्राण्याचे अस्थि कोश आहे. कवड्यांमध्ये पैसा-आकर्षण हा नैसर्गिक गुण असतो.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : देवी लक्ष्मीच्या पूजेत एक कवडी असली पाहिजे, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी-पूजन एका तरी कवडीशिवाय करू नये. समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि कवडीदेखील समुद्रातूनच मिळतात, म्हणून लक्ष्मीची पूजा करून संपत्ती प्राप्त करू इच्छिणारे भक्त लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांचा नक्की वापर करतात. पूजेत पिवळ्या कवड्या अर्पण करण्याचा जणू नियमच आहे. जर पिवळ्या कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्याही वापरता येतात. अशाप्रकारे देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक स्थिती सुधारते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेमध्ये कवड्यांचे काय (Shukrawar Lakshmi Puja) महत्त्व आहे.

म्हणून लक्ष्मीपूजनात कवडी अर्पण करतात -

देवकीनंदन ठाकूरजी महाराज सांगतात की, लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कवड्यांना खूप महत्त्व आहे. माता लक्ष्मी ज्याप्रमाणे समुद्रातून प्रकट झाली, त्याचप्रमाणे कवड्यादेखील समुद्रातील एका प्राण्याचे अस्थि कोश आहे. कवड्यांमध्ये पैसा-आकर्षण हा नैसर्गिक गुण असतो, असे मानले जाते, त्यामुळेच कवड्या या पूजेत पैशाच्या जवळ ठेवल्या जातात.

लक्ष्मीच्या पूजेत शंख अर्पण केल्याने भक्तांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. हिंदू अनुयायी देखील घर सजवण्यासाठी कवड्यांचा वापर करतात.

अशा प्रकारे कवड्यांचा वापर करा -

जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करत असाल तेव्हा केशर किंवा हळदीच्या द्रावणात कवड्या भिजवावी. पूजेनंतर लाल कापडात वेगवेगळ्या कापडांमध्ये दोन कवड्या बांधून घ्या. एक तिजोरीत ठेवा किंवा दुसरे पैसा असलेल्या बॅगेत, पाकिटात, पिशवीत ठेवा.

हे वाचा - बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा

11 कवड्यांचा नियम -

आता श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्याच्या शुक्रवारी आपण पूजेमध्ये पिवळ्या कपड्यात कवड्या ठेवू शकता. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर 11 कवड्या पिवळ्या कपड्यात बांधून उत्तर दिशेला ठेवा. असे मानले जाते की, यामुळे धनप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो. माता लक्ष्मीशिवाय धनाचा स्वामी म्हटला जाणारा कुबेर देवही यामुळे प्रसन्न होतो.

हे वाचा - तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 12, 2022, 6:15 AM IST

ताज्या बातम्या