मराठी बातम्या /बातम्या /religion /

Kalash Sthapana: पूजेच्या कलशामध्ये नारळाला यासाठी असतं महत्त्व; मंगल कार्ये होतात निर्विघ्न सुरू

Kalash Sthapana: पूजेच्या कलशामध्ये नारळाला यासाठी असतं महत्त्व; मंगल कार्ये होतात निर्विघ्न सुरू

नारळ हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार नारळात त्रिदेवांचाही वास असतो. कलशावर नारळ ठेवल्याने शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कार्ये विना अडथळा पूर्ण होतात.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 ऑगस्ट : पूजा, विधी, गृहप्रवेश यांसारख्या धार्मिक कार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे. या शुभ प्रसंगी कलशाची स्थापना केली जाते आणि कलशाच्या वरची नारळ नक्कीच ठेवला जातो. विशेषत: नवरात्रीच्या निमित्ताने कळस स्थापनेचे महत्त्व अधिकच वाढते. नवरात्रीमध्ये सर्व घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते. कलशाची स्थापना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याच्या सुरुवातीला कलशाची स्थापना (Kalash Sthapana) केली जाते. धार्मिक शास्त्रांमध्ये कळस सुख, समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. पण नारळाशिवाय कलशाची स्थापना अपूर्ण आहे. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घ्या कलशाची स्थापना करताना नारळाचे महत्त्व काय असते आणि कलशाच्या वरती नारळ का ठेवला जातो? कलशात नारळ ठेवण्याचे महत्त्व - नारळ हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार नारळात त्रिदेवांचाही वास असतो. कलशावर नारळ ठेवल्याने शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कार्ये विना अडथळा पूर्ण होतात. नारळ लाल कपड्यात गुंडाळून कच्चा कापूस किंवा कलव्याने बांधून कलशाच्या वर ठेवणंही शुभ असतं. या नियमाने कलशावर नारळ ठेवा - “अधोमुखं शत्रु विवर्धनाय, ऊर्धवस्य वस्त्रं बहुरोग वृध्यै। प्राचीमुखं वित विनाशनाय, तस्तमात् शुभं संमुख्यं नारीलेलंष्।” या श्लोकात कलशात नारळ कसा ठेवावा, हे सांगितले आहे. यानुसार कलशाची स्थापना करताना नारळ ठेवताना लक्षात ठेवा की नारळाचे मुख पूजा करणाऱ्या व्यक्तीकडे असावे. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत ज्या बाजूने नारळ झाडाच्या फांदीला जोडलेला असतो, त्या बाजूचे तोंड व्यक्तीकडे असावे. नारळाचे मुख कलशामध्ये कधीही खालच्या दिशेने करू नये. कलशावर नारळ ठेवून विधीपूर्वक व योग्य नियमाने व कलशाची स्थापना केल्यानेच पूजा यशस्वी होते. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या