मराठी बातम्या /बातम्या /religion /

कबुतरांनी घरात घरटं बनवणं शुभ की अशुभ, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र

कबुतरांनी घरात घरटं बनवणं शुभ की अशुभ, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र

घराच्या गच्चीवर कबुतरांना धान्य घालताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण, असं करू नये. कबुतरांना नेहमी घराच्या अंगणामध्ये खायला द्यावे. त्यामुळे राहू ग्रहाचा दोष दूर होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 05 ऑक्टोबर : आपल्या जीवनात वनस्पती आणि प्राण्यांनाही खूप महत्त्व आहे. प्राणी, पशु-पक्षी हे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठीच फक्त महत्त्वाचे नसून ते भविष्यातील घडामोडींचे संकेतही देतात. धार्मिक ग्रंथात याचा उल्लेख आहे. आपल्या घरी अनेकदा काही पक्षी येत राहतात. काही पक्षी तर आपल्या घरी घरटी बनवून राहू लागतात. शास्त्रानुसार पक्ष्यांचे घरटे बनवणे शुभ किंवा अशुभ मानले जाते. आज जाणून घेऊया आपल्या घरी कबुतराने घरटे बनवणे शुभ आहे की अशुभ.

कबुतराचे घरटे -

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, घरामध्ये कबुतराचे आगमन हे सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. परंतु जर कबुतर घरात कोपऱ्यात राहू लागले तर ते अशुभ मानले जाते. त्याचा अर्थ तुमच्या घरात गरिबी येण्याचा संकेत आहे. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कबुतरांना घरात घरटी बनवू देऊ नयेत.

बुध बलवान -

पौराणिक शास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर कबुतरांना धान्य खाऊ घालावे. यामुळे बुध ग्रह मजबूत होतो आणि जीवनात प्रगती होते. घरात सुख-समृद्धी येते.

छतावर धान्य टाकू नका -

घराच्या गच्चीवर कबुतरांना धान्य घालताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण, असं करू नये. कबुतरांना नेहमी घराच्या अंगणामध्ये खायला द्यावे. त्यामुळे राहू ग्रहाचा दोष दूर होतो.

हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद -

अशाप्रकारे लक्ष्मीजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही नेहमी कबुतरांना दाणे द्यावेत. यामुळे तुमच्या कुटुंबात शांतता राहते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच बुध ग्रह बलवान होतो आणि राहू ग्रहही शांत राहतो.

First published:

Tags: Religion, Vastu