मराठी बातम्या /बातम्या /religion /स्वर्गाच्या वाटेवर जाताना भीमाने द्रौपदीसाठी बांधला होता पूल, हेच ते भारताचं शेवटचं गाव 

स्वर्गाच्या वाटेवर जाताना भीमाने द्रौपदीसाठी बांधला होता पूल, हेच ते भारताचं शेवटचं गाव 

महाभारताचं युद्ध संपल्यावर स्वर्गाच्या वाटेवर जाताना भीमाने द्रौपदीसाठी जिथे पूल बांधला, तो पूल आजही पर्यटकांचं आकर्षण ठरतो आहे. जाणून घ्या, या गावाविषयी.

महाभारताचं युद्ध संपल्यावर स्वर्गाच्या वाटेवर जाताना भीमाने द्रौपदीसाठी जिथे पूल बांधला, तो पूल आजही पर्यटकांचं आकर्षण ठरतो आहे. जाणून घ्या, या गावाविषयी.

महाभारताचं युद्ध संपल्यावर स्वर्गाच्या वाटेवर जाताना भीमाने द्रौपदीसाठी जिथे पूल बांधला, तो पूल आजही पर्यटकांचं आकर्षण ठरतो आहे. जाणून घ्या, या गावाविषयी.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Chamoli, India

  चमोली, 20 जानेवारी : भारताला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तसंच या भूमीला मोठी पौराणिक परंपराही लाभली आहे. अनेक पराक्रमी राजे देशात होऊन गेले. त्यांच्या पराक्रमाच्या कथा आजही सांगितल्या जातात. त्या काळाची साक्ष देणारे काही अवशेष आजही काही गावांमध्ये पाहायला मिळतात. असंच एक गाव बद्रिनाथ धामजवळ वसलं आहे. महाभारताचं युद्ध संपल्यावर स्वर्गाच्या वाटेवर जाताना भीमाने द्रौपदीसाठी जिथे पूल बांधला, तो पूल माणा गावात आजही पर्यटकांचं आकर्षण ठरतो आहे. भारताच्या सीमेवरचं शेवटचं गाव अशीही या गावाची ओळख आहे. 'नवभारत टाइम्स'ने याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

  उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात 3115 मीटर उंचीवर वसलेल्या माणा गावात निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहायला मिळतं. बद्रिनाथला जाणारे पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देतात. त्याचं कारण केवळ इथलं निसर्गसौंदर्यच नाही, तर याच गावात महाभारत काळात भीमाने बांधलेला पूल आहे. असं म्हणतात, की युद्ध संपल्यावर स्वर्गात जाताना पांडव याच वाटेनं गेले. द्रौपदीला सरस्वती नदी ओलांडून पार जाण्यासाठी भीमाने एक मोठी शिळा उचलून तिथं ठेवली. ही शिळा म्हणजेच तो पूल आजही या गावात आहे. नदीच्या जवळ 20 फूट लांबीचे पावलांचे ठसेही दिसतात. हे ठसे भिमाच्या पावलांचे आहेत, असं म्हणतात.

  बद्रिनाथपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेलं हे माणा गाव आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. या गावात शिरतानाच गावाच्या वेशीवर ‘लास्ट इंडियन व्हिलेज’ असं लिहिलेलं दिसतं. त्याचं कारण हे गाव भारताच्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे. या गावात असलेलं भारतातलं शेवटचं दुकान पाहण्यासाठीही पर्यटक गर्दी करतात. तिथला चहा पिऊन पर्यटक गावाची भटकंती करतात.

  हेही वाचा - JNU मध्ये निर्माण केली भयावह परिस्थिती; काय आहे यामागचे कारण?

  भीमाने तयार केलेल्या पुलाव्यतिरिक्त गावात व्यास गुहा आणि गणेश गुहा आहेत. असं म्हणतात, की महर्षी व्यासांनी याच गुहेत चारही वेद आणि गीतेची रचना केली होती. त्यामुळे या गुहेचं नाव व्यास गुहा असं पडलं. या गुहेला व्यास पुस्तक असंही म्हटलं जातं. व्यास गुहेपाहून थोड्याच अंतरावर गणेश गुहा आहे. असं म्हणतात, की महर्षी व्यासांनी त्यांच्या गुहेत बसून गणपतीला महाभारताची कथा सांगितली होती व ती गणेशाने या गुहेत बसून लिहून घेतली होती. महाभारतकालीन घटनांचे साक्षीदार म्हटल्या जाणाऱ्या गोष्टी आजही या गावात पर्यटकांना पाहायला मिळतात. त्यामुळे या गावात पर्यटकांचा ओघ वाढतो आहे.

  First published:

  Tags: History, India