मराठी बातम्या /बातम्या /religion /

या राशीची मुलं असतात प्रचंड हट्टी आणि रागीट; त्यांना समजावणं सोपं काम नसतं

या राशीची मुलं असतात प्रचंड हट्टी आणि रागीट; त्यांना समजावणं सोपं काम नसतं

मुलांचा हट्टीपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. पण जास्त हट्टीपणा ही पालकांसाठी मोठी डोकेदुखी बनते. कोणत्या राशीची मुलं जास्त हट्टी, रागीट असतात, त्याविषयी जाणून घेऊया.

मुलांचा हट्टीपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. पण जास्त हट्टीपणा ही पालकांसाठी मोठी डोकेदुखी बनते. कोणत्या राशीची मुलं जास्त हट्टी, रागीट असतात, त्याविषयी जाणून घेऊया.

मुलांचा हट्टीपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. पण जास्त हट्टीपणा ही पालकांसाठी मोठी डोकेदुखी बनते. कोणत्या राशीची मुलं जास्त हट्टी, रागीट असतात, त्याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 ऑगस्ट : मुलं हे देवाचं रूप असतात असं म्हणतात. मुलांचे मन आणि हृदय आरशासारखे स्वच्छ असते. पण, जेव्हा हीच मुले हट्टी आणि रागीट बनतात तेव्हा कोणत्याही पालकांसाठी ती मोठी समस्या बनतात. मुलांचा हट्टीपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. पण जास्त हट्टीपणा ही पालकांसाठी मोठी डोकेदुखी बनते. दिवसेंदिवस हा त्रास मूल आणि पालक दोघांनाही वाढत जातो आणि त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या जीवनावरही होताना दिसतो. यामागे राशीचक्र देखील जबाबदार असू शकते, हे अनेकांना माहीत नाही. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया मुलांच्या खूप हट्टी असणे आणि राशींविषयी माहिती.

या राशीची मुले खूप रागीट असतात -

वृषभ -

वृषभ राशीची मुले खूप रागीट आणि हट्टी असतात. ते स्वतःसमोर कोणालाच जुमानत नाहीत. एखाद्या गोष्टीचा आग्रह किंवा हट्ट धरला तर ते खूप प्रयत्नांनीही ऐकत नाहीत आणि कोणत्याही वस्तूवर त्यांचा हक्क असल्यास ती वस्तू कोणत्याही किंमतीत सोडायला ते मान्य नसतात. अनेकदा या राशीच्या मुलांना योग्य-अयोग्य काहीही समजत नाही.

सिंह राशी -

जर तुमच्या मुलाची राशी सिंह राशी असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीची मुले खूप हट्टी असतात. त्यांना समोरच्या कोणाचेही ऐकायला आवडत नाही. त्यांना असे वाटते की, सर्व काही त्यांच्या मनानुसार चालले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करण्याचा या मुलांचा निर्धार असतो. आजूबाजूच्या लोकांनाही त्यांच्याच अटींवर चालवायचे असते.

कन्या रास -

कन्या राशीची मुले इतर राशीच्या मुलांपेक्षा जास्त रागीट आणि हट्टी असतात. या राशीची मुलं नेहमी आपला मुद्दा समोरच्याच्या गळी उतरवतात. याशिवाय, त्यांना समजावून सांगणे खूप कठीण असते. आपण जे बोलतो ते बरोबर आहे असे या मुलांना वाटते. आपण जे म्हणतोय तेच खरं मानावं यासाठी ते हट्ट धरतात.

हे वाचा - बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा

वृश्चिक -

वृश्चिक राशीची मुले खूप हट्टी आणि रागीट असतात. त्यांना वाटतं प्रत्येकजणाने त्यांचे ऐकावे, परंतु ते फक्त त्यांच्या मनानेच करतात. आपला मत पटवून देण्याच्या नादात इतरांशी संबंध तोडण्यातही त्यांना अजिबात संकोच वाटत नाही. वृश्चिक राशीच्या मुलांना नेहमी वाटत राहतं आपण जे करतोय ते योग्यच आहे.

हे वाचा - तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Personal life, Religion