मराठी बातम्या /बातम्या /religion /Pune : आळंदीमध्ये कशी सुरू झाली कार्तिकी एकादशीची यात्रा? पाहा Video

Pune : आळंदीमध्ये कशी सुरू झाली कार्तिकी एकादशीची यात्रा? पाहा Video

X
कोरोना

कोरोना व्हायरसमुळे असलेले निर्बंध रद्द झाल्यानंतर आळंदीमध्ये पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची यात्रा होत आहे. या यात्रेला गेल्या 725 वर्षांपासूनचा इतिहास आहे.

कोरोना व्हायरसमुळे असलेले निर्बंध रद्द झाल्यानंतर आळंदीमध्ये पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची यात्रा होत आहे. या यात्रेला गेल्या 725 वर्षांपासूनचा इतिहास आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Pune, India

  आळंदी, पुणे 20 डिसेंबर : संत ज्ञानेश्वर महाराजांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी निमित्तानं आळंदींमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. आज (20 नोव्हेंबर) रोजी असलेली कार्तिकी एकादशी आणि मंगळवारी (22 नोव्हेंबर) रोजी होणारा संजीवन समाधी सोहळा या दोन्ही कार्यक्रमानिमित्त अलंकापुरीत अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे असलेले निर्बंध रद्द झाल्यानंतर आळंदीमध्ये पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीची यात्रा होत आहे. या यात्रेला गेल्या 725 वर्षांपासूनचा इतिहास आहे.

  काय आहे इतिहास?

  कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी येथील यात्रेचे महत्त्व भाऊ महाराज फुरसुंगीकर यांनी सांगितले आहे. फुरसुंगीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,'संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक एकादशीला संजीवन समाधी घेतली होती. त्यानंतर भगवंताने म्हणजे विठ्ठलानं माझी कार्तिकीची एकादशी साजरी केली जाते तसेच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी  साजरी केली जाईल असा आशीर्वाद श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना दिला.

  Ekadashi Katha: ती अवतरली अन् महाविष्णूवरचा वार झेलला; एकादशी करण्याचा असा झाला प्रारंभ

  जगदगुरू संत तुकाराम महाराज यांनी अनुग्रह घेतल्यानंतरही या यात्रेचा संदर्भ दिला आहे. |चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू; होतील संतांच्या भेटी सांगू सुखाचिया गोष्टी!जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक! या शब्दात तुकाराम महाराजांनी या यात्रेबाबात आवाहन केले होते. त्याचा सर्व जनमानसावर मोठा परिणाम झाला.'

  काय असतो कार्यक्रम?

  ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा श्री गुरु हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो.कार्तिकी अष्टमीला संजीव समाधी सोहळ्याला सुरुवात होते.  कार्तिक अमावस्येपर्यंत हा सोहळा असतो. या सोहळ्याच्या दरम्या येणाऱ्या कार्तिकी एकादशीला मोठे महत्त्व असते. यासोबतच कार्तिक अमावस्येला महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होते. आणि संजीवनी समाधी सोहळ्याची सांगत होते.

  Utpatti Ekadashi 2022 : एक दोन नव्हे 5 शुभ योगात आहे उत्पत्ती एकादशी; व्रतारंभ करण्याचा शुभ दिवस

  यात्रे अलंकापुरी येतील ते आवडती विठ्ठला!जो करील याची यात्रा तो तारीला सगळं गोत्रा!

  हा भगवंताने दिलेला संदेश सर्व संत मांदियाळीने सर्व जनमानसात रुजवला आहे.

  या कारणामुळेच आळंदीला कार्तिकी एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवनी समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

  First published:

  Tags: Local18, Pune, Religion, Wari