मराठी बातम्या /बातम्या /religion /कामदा एकादशी: महाविष्णूच्या या मंत्राची शक्ती अपार! कित्येक पिढ्यांना कमी नाही पडत पैसा-संपत्ती

कामदा एकादशी: महाविष्णूच्या या मंत्राची शक्ती अपार! कित्येक पिढ्यांना कमी नाही पडत पैसा-संपत्ती

महाविष्णूच्या मंत्राचे फायदे

महाविष्णूच्या मंत्राचे फायदे

कामदा एकादशीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या काही मंत्रांचा जप केल्यास घरात धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची कमतरता येत नाही. कित्येत पिढ्यांचा उद्धार होतो, असे मानले जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 एप्रिल : हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चैत्र नवरात्री आणि रामनवमीनंतर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 11 व्या दिवशी कामदा एकादशी व्रत पाळले जाते आणि यावर्षी हे व्रत 1 आणि 2 एप्रिल या दोन्ही दिवशी पाळले जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र शुक्ल एकादशी 1 एप्रिल रोजी पहाटे 1:58 वाजता सुरू होते आणि 2 एप्रिल रोजी पहाटे 4:19 वाजता समाप्त होते. धार्मिक श्रद्धेनुसार कामदा एकादशी व्रतामध्ये परंपरेनुसार भगवान विष्णूची पूजा करावी.

कामदा एकादशीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या काही मंत्रांचा जप केल्यास घरात धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची कमतरता येत नाही. आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कामदा एकादशीच्या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करावा, हे सांगणार आहोत.

अशी पूजा करा -

ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, कामदा एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून ध्यान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर चौरंगावर विष्णूची मूर्ती बसवावी. कलश ठेवावा आणि कलशात पाणी, सोबत दिवा आणि रोळी घेऊन भगवान विष्णूला अभिषेक करावा. यानंतर भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. दूध, फळे, फुले, पंचामृत आणि तेल इत्यादी अर्पण करा, यासोबत देशी तुपाचा दिवा लावा.

या मंत्रांचा जप -

कामदा एकादशीच्या दिवशी सर्व विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करावी. कामदा एकादशी व्रताची कथा ऐकावी. काही प्रभावी मंत्रांचा जप करावा.

ॐ अच्युताय नमः,

ॐ गोविंदाय नमः,

ॐ अनंताय नमः

श्रीहरि विष्णुचे पंचरूप मंत्र -

ॐ अं वासुदेवाय नम:

ॐ आं संकर्षणाय नम:

ॐ अं प्रद्युम्नाय नम:

ॐ अ: अनिरुद्धाय नम:

ॐ नारायणाय नम:

ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान।

यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्‍टं च लभ्यते।।

कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा जप करा. यामुळे आयुष्यातील सर्व संकटे आपोआप दूर होतात, घरामध्ये धन-समृद्धीचे दरवाजे उघडतात. 7 पिढ्यांसाठी घरात पैशांची कमतरता भासणार नाही. मात्र, मंत्रांचा उच्चार करताना स्पष्ट आणि शुद्ध असावेत, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Ekadashi, Religion