मराठी बातम्या /बातम्या /religion /

काजळ-सूरमा केवळ सौंदर्यच वाढवत नाहीत तर शनिदोषही करतात दूर, अशापद्धतीने करा वापर

काजळ-सूरमा केवळ सौंदर्यच वाढवत नाहीत तर शनिदोषही करतात दूर, अशापद्धतीने करा वापर

स्त्रिया डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळ किंवा सुरमा वापरतात. डोळ्यांमध्ये शुद्ध काजळ लावल्याने डोळ्यांशी संबंधित अनेक आजार दूर होतात, अशीही मान्यता आहे.

स्त्रिया डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळ किंवा सुरमा वापरतात. डोळ्यांमध्ये शुद्ध काजळ लावल्याने डोळ्यांशी संबंधित अनेक आजार दूर होतात, अशीही मान्यता आहे.

स्त्रिया डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळ किंवा सुरमा वापरतात. डोळ्यांमध्ये शुद्ध काजळ लावल्याने डोळ्यांशी संबंधित अनेक आजार दूर होतात, अशीही मान्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 4 डिसेंबर : आपण सर्वांनी अनेकदा महिलांना डोळ्यात काजळ किंवा सुरमा लावताना पाहिले आहे. महिला डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळ किंवा सुरमा वापरतात. डोळ्यांमध्ये शुद्ध काजळ लावल्याने डोळ्यांशी संबंधित अनेक आजार दूर होतात, असेही मानले जाते. ज्योतिषशास्त्रात काजल आणि सूरमा शनि, राहू आणि केतू या ग्रहांशी संबंधित आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू हा जादूटोणा आणि भ्रमाचा कारक ग्रह मानला जातो. राहूवर उपाय म्हणून काजळ आणि सूरमाचा वापर करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी काजळ आणि सूरमा लावण्याचे ज्योतिषी फायदे सांगितले आहेत.

Vastu Dosh : या वास्तु दोषांमुळे घरात सारखं येतं आजारपण, वेळीच ओळखून करा हे उपाय

काजळ आणि सुरमाचे उपाय

- ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की, जर मंगळाची स्थिती तुमची चांगली जात नसेल तर रोज हनुमान चालिसाचे पठण करण्यासोबतच डोळ्यात पांढरा सुरमा घालावा. असे केल्याने मंगळाची स्थिती ठीक होईल आणि तुमचा मंगळ योग्य असेल तर शनि, राहू आणि केतूचे सर्व दोष आपोआप संपतील.

- ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत मंगळ बरोबर असेल तर सर्व काही ठीक आहे. पण मंगळाची दशा चांगली नसेल तर मंगळासोबतच शनि, राहू आणि केतूचे दोषही वाढतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी किमान ४० दिवस डोळ्यांमध्ये पांढरा सुरमा लावा. यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष संपेल. सूरमा मंगळवार आणि शनिवारी लावावे.

- ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला शनीची साडेसती टाळायची असेल, तर तुम्ही 1 एका बॉटलमध्ये काळा सुरमा घेऊन शनिवारी त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 9 वेळा उतरावा आणि ही बॉटल अज्ञात ठिकाणी जमिनीत गाडून टाकावी. निघताना मागे वळून पाहू नये, असे केल्याने व्यक्तीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो.

Vastu Tips : अशोकाचं झाड पती-पत्नीच्या नात्यातील तणाव करेल दूर, करा हे सोपे उपाय

- तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या नोकरीच्या संदर्भात काही समस्या असल्यास किंवा नोकरी जाण्याचा धोका असल्यास, तुम्ही काजळाची एक मोठी गाठ आणून ती शनिवारी एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाकावी. हा उपाय करताना काजळी घ्या की काजळाची गाठ किमान ५ ग्रॅम किंवा त्याहून अधिक असावी. असे केल्याने तुमच्या नोकरीवरील संकट टळेल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Health Tips, Lifestyle, Religion, Vastu