मराठी बातम्या /बातम्या /religion /जया एकादशी करणाऱ्या सर्वांनी वाचावी/ऐकावी ही कथा; मोक्ष प्राप्तीचा मार्ग

जया एकादशी करणाऱ्या सर्वांनी वाचावी/ऐकावी ही कथा; मोक्ष प्राप्तीचा मार्ग

जया एकादशीची कथा

जया एकादशीची कथा

पद्मपुराणातील कथेनुसार देवराज इंद्र स्वर्गात राज्य करत होते. सर्व देवदेवता स्वर्गात सुखाने वावरत होत्या. एकदा इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदरबनला भेटायला गेले. त्यांच्यासोबत गंधर्वही होते. त्यात अप्सरा पुष्पावती आणि गंधर्व मल्यवानही होते.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 फेब्रुवारी : आज बुधवार, 01 फेब्रुवारीला जया एकादशी व्रत आहे. या दिवशी व्रत पाळून भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. हे व्रत केल्यानं आत्म्यांना भूत, प्रेत, पिशाच योनी यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पूजेच्या वेळी जया एकादशी व्रताचा महिमा सांगताना भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितलेली पद्मपुराणातील प्रसिद्ध कथा ऐकावी. जया एकादशी व्रत कथेमध्ये अप्सरा पुष्पावती आणि मल्यवान यांच्या कथेचे वर्णन आहे.

जया एकादशी व्रत कथा -

पद्मपुराणातील कथेनुसार देवराज इंद्र स्वर्गात राज्य करत होते. सर्व देवदेवता स्वर्गात सुखाने वावरत होत्या. एकदा इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदरबनला भेटायला गेले. त्यांच्यासोबत गंधर्वही होते. त्यात अप्सरा पुष्पावती आणि गंधर्व मल्यवानही होते.

त्या वेळी पुष्पावतीने मल्यवानला पाहिले आणि त्याच्या प्रेमात पडली. मल्यवाननेही तिला पाहिले आणि तोही तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. ते दोघेही भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी नाचत आणि गात होते. पण दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते त्यामुळे त्यांचे मन विचलित झाले होते.

मल्यवान आणि पुष्पावती यांचे प्रेम इंद्रदेवांना समजले, कारण ते दोघेही त्यांच्या कामात लक्ष केंद्रित करू शकत नव्हते. हा आपला अपमान मानून इंद्राने माल्यवन आणि पुष्पावती यांना शाप दिला. ते म्हणाले की, आतापासून तुम्ही दोघे स्वर्गातून पृथ्वीवर राहाल आणि तेथे तुम्हाला पिशाच्चाच्या रूपात दुःख भोगावे लागेल. शापामुळे माल्यवान आणि पुष्पावती हिमालयात आले आणि पिशाच योनीत दुःखी जीवन जगू लागले.

एके दिवशी माघ शुक्ल पक्षातील जया एकादशी होती. माल्यवन आणि पुष्पावती यांनी त्या दिवशी अन्न न खाऊन फळे आणि फुलांवर दिवस घालवला. सूर्यास्ताच्या वेळी त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून रात्र काढली. त्या रात्री त्यांना थंडीमुळे झोप येत नव्हती, त्यामुळे त्याला रात्री जाग आली. जया एकादशी व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे प्रात:काळ होताच तो पिशाच्च योनीतून मुक्त झाला.

हे वाचा - आज जया एकादशी, व्रत करणाऱ्यांनी पाहुन घ्या शुभ मुहूर्त, पूजेचे धार्मिक महत्त्व

 भगवान विष्णूंच्या कृपेने दोघांनाही सुंदर शरीर प्राप्त झाले आणि ते स्वर्गात गेले. दोघांनी देवराज इंद्राला नमस्कार केला. त्याला पाहून इंद्राला धक्का बसला आणि त्याने पिशाच योनीतून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. तेव्हा माल्यवानाने सांगितले की, भगवान विष्णूच्या कृपेने आणि जया एकादशी व्रताच्या पुण्य प्रभावाने दोघांची पिशाच योनीतून मुक्ती झाली.

अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. तो आपल्या व्रताचे पुण्य पूर्वजांना दान करू शकतो, जेणेकरून कोणी पिशाच, भूत किंवा आत्मा योनीत असेल तर त्याला मुक्ती मिळू शकेल.

First published:

Tags: Lifestyle, Religion