मराठी बातम्या /बातम्या /religion /

Janmashtami: कृष्ण-जन्माष्टमी दिवशी 'या' वस्तू खरेदी करा, घरात सुख-समृद्धी नांदेल!

Janmashtami: कृष्ण-जन्माष्टमी दिवशी 'या' वस्तू खरेदी करा, घरात सुख-समृद्धी नांदेल!

घरात सुख-समृद्धी नांदावी, श्रीकृष्णाची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं आवश्यक आहे.

घरात सुख-समृद्धी नांदावी, श्रीकृष्णाची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं आवश्यक आहे.

घरात सुख-समृद्धी नांदावी, श्रीकृष्णाची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : श्रावण (Shravan) महिना व्रत-वैकल्यासाठी उत्तम मानला जातो. या महिन्यात प्रामुख्यानं भगवान शंकरांची पूजा केली जाते. तसंच भगवान श्रीकृष्णाच्या (Lord Krishna) भक्तांसाठीदेखील हा महिना विशेष असतो. श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आदी महत्त्वाचे सण असतात. जन्माष्टमीच्या (Janmashtami) निमित्ताने भाविक भक्त व्रत-वैकल्यं, पूजाविधी करतात. श्रीकृष्णाचं भजन-कीर्तन करतात, त्यात दंग होतात. घरात सुख-समृद्धी नांदावी, श्रीकृष्णाची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं आवश्यक आहे. या वस्तू भगवान श्रीकृष्णाला विशेष प्रिय आहेत. यामुळे श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो, असं जाणकार सांगतात. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे ही तिथी विशेष मानली जाते. या दिवशी भाविक बाळकृष्णाची पूजा करतात. मंदिरांमध्ये श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या दिवशी काही विशेष वस्तू खरेदी केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते, असं ज्योतिषशास्त्राचे (Jyotish Shastra) जाणकार सांगतात. जन्माष्टमीच्या दिवशी वैजयंतीची माळ आवर्जून खरेदी करावी. यामुळे घरात समृद्धी येते. घरातल्या सदस्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहते. वैजयंतीच्या माळेत लक्ष्मीमातेचा वास असतो, असं मानलं जातं. Janmashtami 2022: म्हणून पंचामृत सर्व महत्त्वाच्या पूजेमध्ये वापरतात, श्रीकृष्णाशी आहे असा संबंध भगवान श्रीकृष्णाला लहानपणापासूनच गायीविषयी (Cow) विशेष प्रेम होतं. गायीच्या दुधापासून तयार केलेलं लोणी (Butter) त्यांना खूप आवडायचं. ज्योतिषशास्त्रानुसार, गायीत देवगुरू बृहस्पतींचा वास असतो. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी गाय आणि वासराचा एखादा छोटा फोटो खरेदी करावा. हा फोटो देवघरात किंवा घरातल्या ईशान्य कोपऱ्यात लावावा. यामुळे श्रीकृष्णाची कृपादृष्टी प्राप्त होते. भाग्यवृद्धी होते, तसंच इच्छुकांना अपत्यप्राप्ती होते. भगवान श्रीकृष्णाला बासरी (Flute) अत्यंत प्रिय आहे. ते नेहमी बासरी वाजवत. त्यामुळे बासरीविना त्यांचा कोणताही फोटो पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचं बासरीवर अत्यंत प्रेम असल्याने त्यांना बन्सीधर, मुरलीधर असंही म्हणतात. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी बासरी खरेदी करणं लाभदायक ठरतं. यामुळे घरात अडचणी राहत नाहीत. आर्थिक स्थिती चांगली राहते. या दिवशी लाकडाची किंवा चांदीची छोटी बासरी अवश्य खरेदी करावी. भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना ही बासरी अर्पण करावी. त्यानंतर ही बासरी घरातल्या तिजोरीत ठेवावी. भगवान श्रीकृष्णाला गाय आणि लोणी प्रिय आहे. लहानपणी श्रीकृष्ण चोरून लोणी खात असे. त्यामुळे त्यांना माखनचोर असंही संबोधतात. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी लोणी खरेदी करावे आणि त्याचा नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला दाखवावा. भगवान श्रीकृष्णाला मोरपीस खूप आवडतं. ते मुकुटावर नेहमी मोरपीस लावत. वास्तुशास्त्रानुसार, मोरपीस सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतं. यामुळे वास्तुदोष दूर होतात. जन्माष्टमीच्या दिवशी घरात मोरपीस लावल्याने गृहक्लेश होत नाही. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
First published:

Tags: Shri krishna janmashtami

पुढील बातम्या