मराठी बातम्या /बातम्या /religion /नवरात्रीत या 5 वस्तू खरेदी करणे शुभ, घरावर राहील देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद

नवरात्रीत या 5 वस्तू खरेदी करणे शुभ, घरावर राहील देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद

नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते.

नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते.

नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च:  नवरात्रीच्या काळात सकाळ-संध्याकाळ आरती आणि मंत्रोच्चार केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते. या दरम्यान जे 9 दिवस उपवास करतात, त्यांच्यावर देवीचा आशीर्वाद राहतो. देवीची पूजा केल्याने घरातील दुःख आणि दारिद्र्य दूर होते. याशिवाय नवरात्रीच्या काळात तुम्ही काही वास्तु टिप्सदेखील अवलंबू शकता, ज्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येईल.

जाणून घ्या, नवरात्रीच्या काळात अशा कोणत्या वस्तूंची खरेदी करावी, ज्यामुळे घराची वास्तू सुधारते...

नवरात्रीत काय खरेदी करावी

नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. याशिवाय नवरात्रीच्या काळात तुम्ही मातीचे छोटे घर खरेदी करून देवी मंदिरात ठेवू शकता, हे घरामध्ये सौख्य आणण्याचे काम करेल.

घरात मातीचे घर आणल्याने संपत्तीशी संबंधित योग तयार होतात. यामुळे पैशाची अडचण येत नाही. दुसरीकडे, विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये देवीला लाल ओढणी घालावी. असे केल्याने पतीचे आरोग्य सुधारते आणि ते दीर्घायुषी होतात.

नवरात्रीच्या काळात वस्त्र खरेदी करून घरात आणा. देवीला अर्पण करा. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील.

नवरात्रीच्या काळात पताका खरेदी करणे आणि अर्पण करणे देखील चांगले मानले जाते.

पताका म्हणजे विजयाचे चिन्ह. 9 दिवस घरी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पताकाची पूजा करणे शुभ आहे. त्यामुळे भाविकांनी या वास्तु टिप्सचा अवलंब करायला हरकत नाही.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Navratri, Rashibhavishya, Rashichakra, Religion