मुंबई, 26 मे : हिंदू धर्मात पाळल्या जाणार्या सर्व उपवासांपैकी एकादशी व्रत तसं कठीण असतं. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी निर्जला एकादशीचे व्रत सर्वोत्तम आणि अवघड मानले जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या शेषशयिया रूपाची पूजा केली जाते. या दिवशी पाणी, अन्न आणि फळांशिवाय उपवास केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्यास सर्व 24 एकादशीं इतके फळ मिळते.
यावर्षी 31 मे 2023 रोजी निर्जला एकादशी व्रत पाळले जात आहे. निर्जला एकादशीच्या उपवासात पाणी पिण्यासही मनाई आहे, परंतु उष्णतेमुळे अनेकजण तहान लागल्यावर पाणी पितात. त्यामुळे त्यांचा उपवास मोडतो. अशा परिस्थितीत निर्जला एकादशीच्या उपवासात पाणी कसे प्यावे, जेणेकरून तुमचा उपवास तुटणार नाही आणि तुमची तहानही भागेल, याविषयी ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत.
हिंदू धर्मीय मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाभारत काळात, हे व्रत पाळल्याने भीमाने 10,000 हत्तींचे बळ प्राप्त केले आणि दुर्योधनावर विजय मिळवला. हे व्रत लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी पाळू नये, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. उपवासाच्या वेळी पाण्याचे सेवन केल्यास हा उपवास मोडतो, परंतु जीवघेणी परिस्थिती उद्भवल्यास पाणी प्यायला हवे, निर्जला एकादशीच्या उपवासात तहान लागल्यास शास्त्रातही पाणी पिण्याची विशिष्ट पद्धत सांगितली आहे.
अशाप्रकारे तुम्ही पाणी पिऊ शकता -
निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये पाणी आणि अन्न खाणे निषिद्ध आहे. हे व्रत नीट पाळले तरच पूर्ण फळ प्राप्त होते, परंतु उपवासात पाण्याशिवाय माणूस जगू शकला नाही किंवा त्याचा जीव धोक्यात आल्यास अशा स्थितीत त्या व्यक्तीने 12 वेळा "ओम नमो नारायणाय" चा जप करावा. यानंतर ताटात पाणी घेऊन गुडघा व हात जमिनीवर ठेकवून जनावरे ज्या पद्धतीनं पाणी पितात, तशा प्रकारे पाणी घेतल्याने निर्जला एकादशीचे व्रत मोडत नाही.
गजकेसरी योग जुळून आल्यानं या 3 राशींची चांदी! नवीन नोकरी, धनलाभ होईल
शुभ मुहूर्तावर सोडा उपवास -
धार्मिक मान्यतांनुसार, निर्जला एकादशीच्या व्रताचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते. जेव्हा हे व्रत योग्य मुहूर्तावर सोडले जाते. धार्मिक मान्यतेनुसार व्यक्तीने द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर उपवास सोडावा. जे लोक हे व्रत करतात त्यांनी सकाळी स्नान करून भगवान विष्णूंना नमन करावे आणि पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि योग्यतेनुसार त्यांना दक्षिणा देऊन सन्मानपूर्वक त्यांना निरोप द्यावा. यानंतर, आपला उपवास सोडवा.
Numerology: विश्वास पात्र असतात अशा व्यक्ती; निष्ठावान जोडीदारही बनू शकतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ekadashi, Religion, Religion18