मराठी बातम्या /बातम्या /religion /

Indira Ekadashi Vrat 2022: इंदिरा एकादशी व्रताच्या दिवशी ही कथा वाचावी, पूर्वजांना मिळतो मोक्ष

Indira Ekadashi Vrat 2022: इंदिरा एकादशी व्रताच्या दिवशी ही कथा वाचावी, पूर्वजांना मिळतो मोक्ष

सत्ययुगात इंद्रसेन नावाचा राजा महिष्मती नगरावर राज्य करत होता. तो भगवान विष्णूचा भक्त होता, त्याला कशाचीही कमतरता नव्हती. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या दरबारात आले. राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे प्रयोजन विचारले.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 सप्टेंबर : यंदा उद्या बुधवारी 21 सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत आहे. एकदा धर्मराजा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला भाद्रपद एकादशी व्रताचे महत्त्व सांगण्यास सांगितले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले की हे व्रत इंदिरा एकादशी व्रत म्हणून ओळखले जाते. हे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते, पाप नाहीसे होते आणि पूर्वजांना मोक्ष मिळतो. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट इंदिरा एकादशी व्रताची कथा सांगत आहेत. इंदिरा एकादशी व्रताची कथा - सत्ययुगात इंद्रसेन नावाचा राजा महिष्मती नगरावर राज्य करत होता. तो भगवान विष्णूचा भक्त होता, त्याला कशाचीही कमतरता नव्हती. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या दरबारात आले. राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा नारदजी म्हणाले की, मी एके दिवशी यमलोकात गेलो होतो. तेथे यमराजांना भेटलो, त्यांचे कौतुक केले. त्यादरम्यान मी तुझ्या वडिलांना पाहिले. ते यमलोकात होते. नारदजींनी आपल्या वडिलांचा संदेश राजा इंद्रसेनला सांगितला. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, काही कारणास्तव त्यांच्या एकादशी व्रतामध्ये काही अडथळे येत होते, त्यामुळे त्यांना यमलोकात यमराजांसोबत वेळ घालवावा लागतोय. तुमच्याकडून शक्य असेल तर वडिलांसाठी इंदिरा एकादशीचे व्रत करा. याने ते यमलोकातून मुक्त होऊन स्वर्गात स्थान मिळवू शकतील. तेव्हा राजा इद्रसेनने नारदांना इंदिरा एकादशी व्रताची पद्धत सांगण्यास सांगितले. नारदजी म्हणाले की, इंदिरा एकादशी व्रताच्या दिवशी स्नान वगैरे करून भगवान शालिग्रामसमोर पितरांचे श्राद्ध करा. ब्राह्मणांना फळे आणि अन्न अर्पण करा नंतर त्यांना दक्षिणा द्या. त्यानंतर उरलेले अन्न गायीला खाऊ घाला. त्यानंतर धूप, दिवा, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादींनी भगवान ऋषिकेशची पूजा करावी. नंतर रात्री भागवत जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. यानंतर स्वतः भोजन करून व्रत पूर्ण करा. नारदजी म्हणाले की हे राजन! जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले तर तुमच्या वडिलांना नक्कीच स्वर्गात स्थान मिळेल. यानंतर नारदजी तेथून निघून गेले. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आल्यावर राजा इंद्रसेनने इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे त्यांचे वडील यमलोकातून मुक्त होऊन विष्णुलोकात गेले. मृत्यूनंतर राजा इंद्रसेनलाही स्वर्ग मिळाला. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या