अयोध्या, 26 मार्च: माता जगतजननी जगदंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये लोक विविध उपाय करतात. धार्मिक श्रद्धेनुसार जगदंबा माता चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या भक्तांमध्ये राहते आणि भाविक शास्त्र-पंरपरेनुसार जगदंबेची पूजा करतात. जगदंबेच्या नऊ अवतारांची 9 दिवस पूजा केली जाते, तर दुसरीकडे नवरात्रीमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करणे देखील अत्यंत पवित्र मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबावर राहण्यासाठी नवरात्रीच्या काळात तुम्ही देवीच्या रूपात तुळशीच्या रोपाची पूजा करू शकता. ज्यामुळे देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जाणून घेऊ तुळशीशी संबंधित उपाय, ज्यामुळे जगदंबा आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल.
ज्योतिषाचार्य पंडित कल्कीराम सांगतात की, सनातन धर्मात तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे रूप आहे, जिची लोक सनातन धर्मात पूजा करतात. आत्तापर्यंत तुम्ही, घरी तुळशीचे रोप लावले नसेल तर नवरात्रीच्या काळात ते लावू शकता. घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मानले जाते.
तुळशीच्या रोपाची परिक्रमा -
चैत्र नवरात्रीमध्ये दिवा लावताना माता दुर्गेसोबत तुळशीच्या रोपाजवळही लावा. असे केल्याने लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. एवढेच नाही तर नवरात्रीच्या दिवशी तुळशीची विधिवत पूजा केल्यानं आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. नवरात्रीमध्ये तुळशीच्या रोपाला नियमित पाणी अर्पण करावे. यासोबतच तुळशीच्या रोपाची प्रदक्षिणा करावी, असे केल्याने घरातील आणि कुटुंबातील संकटांपासून मुक्ती मिळते.
हे वाचा - चैत्र नवरात्रीत स्वप्नात अशा गोष्टी दिसणं भाग्यशाली! देवीची कृपा असण्याचे संकेत
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.