- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
Shravan Somvar 2022 : श्रावणात विवाहित महिलांनी नक्की करावे 'हे' उपाय, पतीची होईल प्रगती आणि भरभराट

श्रावण सोमवारचे व्रत हे मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्वोत्तम व्रतांपैकी एक आहे. हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. योग्य जोडीदाराच्या इच्छादेखील पूर्ण होतात कारण माता पार्वतीने कठोर तपस्या आणि उपवासाद्वारे महादेवांना पतीच्या रूपात प्राप्त केले होते.
- News18 Lokmat
- Last Updated: Jul 31, 2022 05:48 PM IST
मुंबई, 31 जुलै : श्रावण महिना आता सुरु झाला आहे. श्रावणात आपल्याकडे व्रतवैकल्य करण्याची परंपरा आहे. श्रावण सोमवारचे व्रत हे मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्वोत्तम व्रतांपैकी एक आहे. हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. योग्य जोडीदाराच्या इच्छादेखील पूर्ण होतात कारण माता पार्वतीने कठोर तपस्या आणि उपवासाद्वारे महादेवांना पतीच्या रूपात प्राप्त केले होते. अविवाहित मुली आणि विवाहित महिला विशेषतः श्रावण सोमवारचा उपवास करतात. पुरुषही आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात. तुम्हाला श्रावणात करण्याच्या काही पूजा सांगणार आहोत. महिलांनी श्रावणात या गोष्टी केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या पतीला कामात यश मिळेल आणि भरभराट होईल.
देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण करा
हरजिंदगी मध्ये दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेबरोबरच स्त्रियांची काही विशेष गोष्टी कराव्या. ज्यामुळे देवी पार्वती प्रसन्न होऊन अखंड सौभाग्याचे वरदान देते. श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात. पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात. हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल. यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल.
श्रावणात दररोज करा हे एक काम; महादेवाची होईल विशेष कृपा
शिवलिंगाला जल अर्पण करा
एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा. सकाळी याच पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगाला जल अर्पण करताना "श्री शिवाय नमस्तुभ्यम्" या मंत्राचा जप करा. हा उपाय श्रावणातील किमान 15 दिवसांपर्यंत करावा लागेल. यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल.
..म्हणून श्रावणात शिवलिंगासमोर दिवा प्रज्वलित करणं असतं शुभ; भोलेनाथाची मिळते विशेष कृपा
महादेवाच्या मंदिरात बेल आणि भस्म दान करा
श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतात. त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे. बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते. विशेषत: श्रावण महिन्यात पती-पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा. संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धीसोबतच धन आणि धान्याही भरपूर येईल