मुंबई, 19 फेब्रुवारी : भारतात ज्योतिष शास्त्राला खूप मोठे महत्व प्राप्त आहे. ज्योतिष शस्त्रानुसार विविध रत्न हे हाताच्या वेगवेगळ्या बोटांमध्ये धारण करता येते . माणसांच्या अडचणीं नुसार, पत्रिकेतील दोषानुसार, ज्योतिषिसल्या नुसार हे रत्न आपण धारण करून त्या रत्नाचे विविध लाभ आपण घेऊ शकतो. व आपल्या काही अडचणींवर आपण मात करू शकतो. खूपदा रत्न धारण करण्यासाठी उजव्या हाताचाच वापर केला जातो. अंगठ्या बाजूच बोट हे तर्जनी म्हणजेच( गुरुच )बोट मानले जाते. त्याबाजूचे बोट हे माध्यमा हे (शनीच) बोट मानले जाते त्या नंतरचे बोट अनामिका हे( सूर्या ) च बोट मानले जाते. आणि शेवटचे बोट हे कनिषिका हे (बुद्धाचे) बोट मानले जाते. गुरु,शनि,सूर्य,बुध हे चार ग्रह आपल्या हाताच्या बोटांचे अधिपति आहे.
तर्जनी मध्ये नक्की कोणत रत्न धारण करावे तर गुरुच रत्न पुखराज हे आपण तर्जनी बोटात धारण करू शकतो.
मधल्या बोटात शनीच रत्न नीलम आपण धारण करू शकतो.
अनामिका बोटात आपण सूर्या च रत्न माणिक आपण धारण करू शकतो त्याचसोबत मंगळाच रत्न पोवळा आपण धारण करू शकतो . आणखीन एक महत्वाच रत्न हिरा देखील आपण धारण करू शकतो.
शेवटच्या बोटात करंगळी हे बुधा च बोट असल्याने त्यात आपण पाचू धारण करू शकतो . करंगळीत आपण मोती देखील धारण करू शकतो.
या 5 चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी, म्हणून या वास्तू फॉलो करून मिळवा समाधान
रत्न किती वजनाचे धारण करावे ?
जातकाच्या वाजनप्रमाणे रत्नाचे वजन ठरवले जाते. समजा जातकाचे वजन हे 20 किलो असेल तर 1 कॅरेट रत्न धारण करणे, 60 ते 80 किलो वजन असेल तर 3 ते 4 कॅरेट चे रत्न धारण करावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion