मराठी बातम्या /बातम्या /religion /

Video : तुम्ही काढता तो स्वस्तिक चुकीचा; इथं पाहा शुभ चिन्हं काढण्याची योग्य पद्धत

Video : तुम्ही काढता तो स्वस्तिक चुकीचा; इथं पाहा शुभ चिन्हं काढण्याची योग्य पद्धत

अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर, पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल. आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते.

अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर, पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल. आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते.

अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर, पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल. आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 23 सप्टेंबर : हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे ज्यामध्ये अनेक चिन्हे पवित्र मानली जातात. यापैकी एक प्रतीक म्हणजे स्वस्तिक. अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर, पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल. आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. पण तुम्हाला स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, स्वस्तिक कसे काढायचे आणि त्याचे काय फायदे आहेत. स्वस्तिकचा अर्थ स्वस्तिक हा शब्द तीन शब्दांपासून बनलेला आहे, 'सु' म्हणजे शुभ, 'अस'- म्हणजे अस्तित्व आणि 'के' म्हणजे कर्ता. अशा प्रकारे स्वस्तिकाचा अर्थ शुभ आहे. स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक देखील मानले जाते आणि ज्या प्रकारे गणपतीची प्रथम पूजा केली जाते. तसेच हिंदू लोक शुभ कार्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह काढतात.

कामावर नेहमी बॉसचा ओरडा खातात या राशीचे लोक, असा करा उपाय

असे काढा स्वस्तिक स्वस्तिक काढताना आधी एक उभी रेष काढा. त्यानंतर त्यावर आडवी रेष काढताना उभ्या रेषेला न कापता आडवी रेष काढा. कारण मधले स्थान हे ब्रह्म देवाचे स्थान साठे त्यामुळे उभिरेश कधी कापायची नाही. त्यानंतर वरच्या बाजूला, उजव्या बाजूला, खालच्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला चार रेषा काढाव्या. एवढ्यावरच स्वस्तिक संपत नाही. या चार रेषांना आणखी चार छोट्या छोट्या रेषा काढणे गरजेचे असते. त्यानंतर या स्वस्तिकमध्ये चार छोटी छोटी टीम्ब द्या. इंस्टाग्रामवर tijtyoharshorts या नावाने एक पोस्ट आहे. यामध्ये स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत सांगितली गेली आहे. तुम्ही याप्रकारे स्वस्तिक काढू शकता.
वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक काढण्याचे फायदे घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी स्वस्तिक बनवले जाते, कारण त्याच्या चार रेषा चार दिशा दर्शवतात अशीही मान्यता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे. ज्योतिषशास्त्रानुसार स्वस्तिक काढण्याचे फायदे - ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर ते कमी करण्यासाठी तुमच्या दुकानाच्या ईशान्य दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवून सलग 7 गुरुवार लावणे फायदेशीर ठरते.

काही झालं तरी या दिवशी यश निश्चित मिळणार; तुमच्यासाठी कोणता दिवस लकी इथं पाहा

- कोणत्याही कामात यश हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा. - घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या रंगाचे स्वस्तिक बनवले जाते. असे मानले जाते की काळ्या रंगाच्या कोळशाने बनवलेले स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा दूर करते.
First published:

Tags: Culture and tradition, Lifestyle, Religion

पुढील बातम्या