मराठी बातम्या /बातम्या /religion /संधी पूर्ण क्षमतेनं वापरून घेण्याचा असतो हातखंडा; U आद्याक्षराच्या लोकांचा असा असतो स्वभाव

संधी पूर्ण क्षमतेनं वापरून घेण्याचा असतो हातखंडा; U आद्याक्षराच्या लोकांचा असा असतो स्वभाव

U अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांचा स्वभाव

U अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांचा स्वभाव

त्यांच्या कल्पना खूप क्रिएटिव्ह/सर्जनशील असतात. तसंच अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तार्किक आणि व्यवहार्य असतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारी : बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.

#अक्षर U: ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात U या अक्षराने त्या व्यक्ती सतत नव्या कल्पना मांडत असतात. नावीन्यपूर्ण कल्पनांचे ते अध्वर्यू असतात. त्यांना पुढाकार घ्यायला आवडतो आणि त्यांना अंमलबजावणीही करायला आवडते. समोर आलेली एकही संधी या व्यक्ती सोडत नाहीत. त्या व्यक्ती सर्व संधी पूर्ण क्षमतेने वापरण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यांच्या कल्पना खूप क्रिएटिव्ह/सर्जनशील असतात. तसंच अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तार्किक आणि व्यवहार्य असतात. त्यांना सत्याची आस असते आणि ते अहिंसक पद्धतीने काम करतात. ते कायम सत्य बोलतात आणि सत्यतेवर त्यांचा विश्वास असतो. ते केवळ वर्तमानात जगतात आणि भूतकाळ विसरून जातात. कारण आयुष्य ही देवाने दिलेलं भेट आहे असं ते मानतात. त्यांना हे माहिती असतं, की भूतकाळाने काही फरक पडत नाही.

वर्तमानात चांगल्या विचारांनी जगलं आणि त्यांना प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली, तरच भविष्य चांगलं होऊ शकतं, असा त्यांचा विश्वास असतो. कर्माच्या तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास असतो. त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. कोणत्याही क्षेत्रात पूर्ण उत्साहाने काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना असामान्य यश मिळतं. तरुण-तरुणी खेळात खूप यशस्वी होतात. कारण त्यांच्याकडे शिकण्याची क्षमता खूप असते आणि त्यांची क्षमताही असीम असते. त्यांची कार्यपद्धती कायम एकमेवाद्वितीय असते. सॉफ्टवेअर, ट्रेनिंग, कमिशनिंग, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, संगीत, पुस्तकं, ऑडिटिंग फर्म्स, जाहिरात, कन्सल्टिंग, कपडे, हॉटेल्स, फूड, बँकिंग आदी क्षेत्रांतल्या कंपन्या उत्तम यश मिळण्यासाठी U या अक्षराने सुरू होणारं नाव निवडू शकतात.

शुभ रंग : Orange & Yellow

शुभ दिवस : गुरुवार

हे वाचा - या राशीच्या सातत्याने वाढणाऱ्या गरजा त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकतात

उपाय :

1. भिकाऱ्यांना किंवा गरिबांना पिवळे तांदूळ दान करा.

2. सकाळी गुरूमंत्राचं पठण करा.

3. दिवसाची सुरुवात करताना कपाळावर चंदन लावा.

4. तुळशीच्या रोपाची निगा राखा. तुमचे गुरू किंवा तुळशी रोपासाठी दिवा लावा.

5. कामाच्या ठिकाणी धातूच्या वस्तू ठेवण्याऐवजी लाकडी वस्तू किंवा फर्निचरची निवड करा.

6. मांसाहार, मद्यपान, तंबाखू खाणं आणि चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा.

First published:

Tags: Numerology, Vastu