मराठी बातम्या /बातम्या /religion /कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याचं असतं कौशल्य; S आद्याक्षराचे लोक या क्षेत्रात चमकतात

कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याचं असतं कौशल्य; S आद्याक्षराचे लोक या क्षेत्रात चमकतात

S अक्षराने नावाची सुरुवात होणारे लोक

S अक्षराने नावाची सुरुवात होणारे लोक

ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात S या अक्षराने होते त्या व्यक्ती सहज मित्र बनवतात. त्या सर्जनशील आणि हुशार असतात. त्या आपल्या स्वतःच्या आवडी वाढवण्यासाठी इतरांचा उपयोग करून घेऊ शकतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी :  बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.

#अक्षर S: ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात S या अक्षराने होते त्या व्यक्ती सहज मित्र बनवतात. त्या सर्जनशील आणि हुशार असतात. त्या आपल्या स्वतःच्या आवडी वाढवण्यासाठी इतरांचा उपयोग करून घेऊ शकतात. या व्यक्ती लोकांशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात. या व्यक्ती खरोखर एकनिष्ठ असतात; पण जलद निर्णय घेण्याच्या सवयीमुळे त्यांची गती कमी होते आणि प्रगती खुंटते. त्यांच्या मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वृत्तीमुळे त्यांची सहजपणे गटाचा नेता म्हणून निवड होते. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेऊ शकतात. या गुणामुळे त्या फार यशस्वी होतात. त्यांनी त्यांचा स्वार्थ पूर्णपणे बाजूला ठेवला ते यशस्वी राजकीय नेते, उद्योगपती, मीडिया पर्सन, स्पोर्ट्स स्टार आणि अभिनेते होऊ शकतात.

विद्यार्थ्यांसाठी S हे अक्षर भाग्यास आणि प्रगतीस कारणीभूत ठरतं. या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यास आणि संवादावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. महत्त्वाच्या मीटिंगला जाताना पिवळे, केशरी, पांढरे, लाल, निळा इत्यादी उठावदार रंगांचे कपडे घालावेत. अशा व्यक्तींना त्यांच्या मायदेशी किंवा परदेशात दोन्ही ठिकाणी यश मिळवण्यासाठी नशीबाची सारखीच साथ मिळते. या व्यक्तींना जीवनात समृद्धी मिळवून देण्यासाठी त्यांच्या जोडीदारांचंही तितकंच योगदान असतं. या व्यक्ती चांगले पालक आणि मुलं होऊ शकतात.

हे वाचा - अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला

उपाय :

1. आश्रमात गहू दान करा.

2. सूर्याला अर्घ्य द्या आणि त्याच्या नावाचा जप करा.

3. ऑफिसमध्ये उत्तरेकडच्या भिंतीवर कृत्रिम सूर्यफूल लावा.

4. आठवड्यातून किमान एकदा आंघोळीच्या पाण्यात हळद घालून त्या पाण्याने आंघोळ करा.

5. चामड्याची नसलेली पिशवी किंवा पाकीट नेहमी सोबत ठेवा.

6. मांसाहार, दारू, तंबाखू, प्राण्यांची कातडी आणि चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळा.

First published:

Tags: Numerology, Rashibhavishya