मराठी बातम्या /बातम्या /religion /अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतत नाहीत, मूल्यांवर आणि तत्त्वांवर ठाम राहतात Q आद्याक्षराचे लोक

अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतत नाहीत, मूल्यांवर आणि तत्त्वांवर ठाम राहतात Q आद्याक्षराचे लोक

Q अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांचा स्वभाव

Q अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांचा स्वभाव

ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात Q या अक्षरानं होते त्या खरेपणानं आपलं आयुष्य जगू इच्छितात. अशा व्यक्तींचं जीवन प्रामाणिकपणा आणि समर्पणाभोवती फिरतं. शिवाय...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी : बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.

#अक्षर Q : ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात Q या अक्षरानं होते त्या खरेपणानं आपलं आयुष्य जगू इच्छितात. अशा व्यक्तींचं जीवन प्रामाणिकपणा आणि समर्पणाभोवती फिरतं. या व्यक्तींचं आयुष्यात एक निश्चित उद्दिष्ट असतं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या व्यक्ती जगत असतात. ध्येय साध्य करण्यासाठी या व्यक्ती सध्याच्या परिस्थितीशी तडजोड किंवा कोणताही त्याग करत नाहीत. या व्यक्ती आपल्या मूल्यांवर आणि तत्त्वांवर ठाम राहतात. गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागते; मात्र त्यांचं शांत व्यक्तिमत्त्व निर्धारित उद्दिष्टं साध्य करण्यात मदत करतं. ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात Q अक्षराने होते, त्या कधीही अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतत नाहीत. या व्यक्तींचं नेतृत्व अत्यंत कार्यक्षम ठरतं. त्याचा निष्ठेवर विश्वास असतो. त्यांना अनेक निष्ठावंत फॉलोअर्स मिळतात. अशा व्यक्ती विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, तत्त्वज्ञ, लेखक किंवा संगीतकार असू शकतात.

या अक्षरानं नाव सुरू होणाऱ्या बिझमेसमन्सनी समूहासोबत काम केलं तरच त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळतं. म्हणून अशा व्यक्तींनी कंपनीत कर्मचारी होण्याऐवजी स्वतःच्या व्यवसायात, विशेषतः कौटुंबिक व्यवसायात काम केलं पाहिजे. Q अक्षरानं नावाची सुरुवात होणारी मुलं शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतात आणि त्यांचा तंत्रज्ञान आणि विज्ञानाकडे कल असतो. या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या स्त्रियांनी संशोधन आणि अध्यापन आदी क्षेत्रं निवडावीत. ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात Q अक्षराने होते ते अंधभक्त असतात. त्यांचा दैवी शक्तींवर फार विश्वास असतो. म्हणून जेव्हा त्यांच्या आजारावर औषधोपचाराची गरज असते तेव्हा त्यांनी सुरुवातीला आयुर्वेद किंवा रेकीसारख्या (जपानी उपचार पद्धत) उपचारांची मदत घेतली पाहिजे.

शुभ रंग : Blue and Grey

शुभ अंक : 5 आणि 6

हे वाचा - मकर राशीत येतोय बुध! या 8 राशीच्या लोकांना पैसा, नोकरी-करिअरमध्ये गुड न्यूज

उपाय :

1. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि पूर्वजांच्या प्रतिमांचं दर्शन घ्या.

2. मद्य आणि मांसाहार टाळा.

3. प्राण्यांच्या कातडीपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर टाळा.

4. घराभोवती हिरवीगार बाग असणं लकी ठरेल.

5. प्राण्यांना Salty Food खाऊ घालणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Numerology, Religion