मराठी बातम्या /बातम्या /religion /नावातील आद्याक्षराचं महत्त्व आणि अर्थ; O आणि P च्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव

नावातील आद्याक्षराचं महत्त्व आणि अर्थ; O आणि P च्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव

O P आद्याक्षराच्या लोकांचा स्वभाव

O P आद्याक्षराच्या लोकांचा स्वभाव

ज्या व्यक्तींची नावं इंग्रजीती O आणि P या अक्षराने सुरू होतात त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांचे भविष्य कसे असते. त्यांचे गुण-दोष याची माहिती पाहु.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.

#अक्षर O : ज्या व्यक्तींची नावं O या अक्षराने सुरू होतात, त्या आत्मकेंद्रित, पण धाडसी असतात. या व्यक्ती आयुष्यात अनेक चढ-उतार पाहतात; पण त्या शेवटपर्यंत हार मानत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला हा गुणधर्म त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरून वर आणू शकतो. या व्यक्ती खूप उच्च स्थानावर पोहोचतात. त्यांना मित्र आणि शत्रू जास्त असतात. त्यांची अनेकदा फसवणूक होते; पण त्यातून त्यांना चांगला धडा मिळतो. अशा व्यक्ती चतुर बनतात. त्यांच्या अंगी असलेला समस्या सोडवण्याचा व्यावहारिक दृष्टिकोन हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा घटक आहे. या व्यक्तींची महत्त्वाकांक्षा त्यांना यशाकडे घेऊन जाते. अशा व्यक्तींना संपत्तीद्वारे मिळणारी श्रीमंती थोड्या उशिराने मिळते. O अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींच्या मनात एकाच वेळी अनेक विचार असात. म्हणून वैयक्तिक अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून ध्यानाचा अवलंब केला पाहिजे. असं केल्यास नशिबाची साथ मिळते.

शुभ रंग : Sky white

उपाय : तुमच्या सोबत कायम पांढरा रुमाल ठेवा.

#अक्षर P : ज्या व्यक्तींची नावं P या अक्षराने सुरू होतात त्या व्यक्ती जीवनात प्रचंड अशांतता असूनही बाहेरून शांत राहतात. या व्यक्ती उदात्त असतात आणि त्यांच्यात इतरांना आनंद देण्याची प्रचंड क्षमता असते. त्या व्यक्ती कोणाबद्दलही वाईट विचार करत नाहीत. या व्यक्तींचे आचार-विचार शुद्ध असतात. अनेक समस्या असूनही ते कधीही दुःखी नसतात. वैयक्तिक नुकसान सहन करून ते मित्रांना मदत करतात. या व्यक्तींना शांत वातावरणात राहायला आवडतं. यांचा देवावर दृढ विश्वास असतो आणि ते सर्व धार्मिक विधींचं पालन करतात. या व्यक्ती समृद्ध, समाधानी, लोकप्रिय, भाग्यवान, स्थिर आणि श्रीमंत असतात. आपल्या सकारात्मक ऊर्जेने इतरांवर प्रभाव टाकण्याइतपत त्यांचं तेजोवलय मजबूत असतं. या व्यक्ती प्रभावी आणि आकर्षक असतात. P या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती, विशेषतः स्त्रिया आपल्या जोडीदारासाठी लकी ठरतात. लग्नानंतर त्यांच्या नशिबात आणखी वाढ होते. सौंदर्यप्रसाधनं आणि लक्झरी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी उत्तम यश मिळविण्यासाठी आपल्या व्यवसायाचं नाव P या अक्षरापासून ठेवावं.

हे वाचा - बालगणेशाची एकमेव मूर्ती, बाप्पाच्या पायावर मुलांना झोपवण्याची आहे प्रथा, Video

शुभ रंग : Yellow and Pink

उपाय :

1. भगवान शंकरावर दुधाचा अभिषेक करा.

2. कृत्रिम दागिन्यांऐवजी चांदी, सोनं किंवा हिऱ्याचे दागिने घाला.

3. घराच्या ईशान्य भागात पाण्यानं भरलेला कलश ठेवा.

4. गरिबांना किंवा गायींना दूध दान करा.

5. नॉन-व्हेज, दारू, तंबाखू यांचं सेवन करू नका आणि चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळा.

First published:

Tags: Numerology, Religion