Mangalagaur pooja in marathi : कशी करावी मंगळागौरीची पूजा? समजून घ्या संपूर्ण विधी

Mangalagaur pooja in marathi : कशी करावी मंगळागौरीची पूजा? समजून घ्या संपूर्ण विधी

मंगळागौरीचे व्रत आणि पूजन कसं करावी याची संपूर्ण माहिती.

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : महाराष्ट्रात मंगळागौरीचं व्रत हे मुख्यत्वे नवविवाहित महिलांनी पाळले जाणारे एक अत्यंत पवित्र व्रत मानले जाते. या दिवशी गौरीची पूजा केली जाते. ही पूजा करण्यासाठी महिला पारंपरिक पोशाख म्हणजेच साडी किंवा नऊवारी नेसून ही पूजा विधी करतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी गौरीचा आशीर्वाद घेतात. तर जाणून घेऊया मंगळागौरीचे व्रत आणि पूजा कशी करावी.

मंगळागौरीचे पूजन सामान्यतः श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी केले जाते. मंगळागौरीचे व्रत महिन्याच्या पहिल्या मंगळवारपासून सुरू होते आणि महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी चालू राहते. यावर्षी श्रावणातील पहिला मंगळावर 2 ऑगस्ट ला आहे तर त्यानंतर 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दिवशी मंगळागौरीचे पूजन केले जाऊ शकते. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी हरितालिका पूजन असणार आहे.

Rakshabandhan 2022 : या शुभ मुहूर्तावर लाडक्या भावाला बांधा राखी, जाणून घ्या शुभ दिशा आणि विधी

असे करावे मंगळागौरीचे व्रत विधी

- सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सोवळं नेसावे. सोवळं नेसून ही पूजा केली जाते. सर्वप्रथम विघ्नहर्ता गणपतीची पूजा करावी. त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करून त्याशेजारी शिवपिंड ठेवावी. नंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी. मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचं आवाहन करावं.

- देवीला विविध झाडांची पाने, फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्या करता देवीला 3 अर्घ्य द्यावीत.

- मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावं. त्यांना भोजन, हळदी-कुंकू द्यावं. संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात.

श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

- साधी फुगडी, एका हाताची फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी असं फुगडीचे अनेक प्रकार खेळले जातात. झिम्मा, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, दोडका कीस, कोंबडय़ाचे तीन-चार प्रकार, सासू-सुनेचं अथवा सवतींचं भांडण असे खेळ रंगतात.

- अशा प्रकारे आनंदाने हा दिवस साजरा होतो. सलग 5 वर्षे हे व्रत करावं. गेल्यावर्षी कोरोनामुळे नवविवाहितांचा काहीसा हिरमोड झाला होता. पण, यावेळी नियम थोडे शिथिल झाले आहेत, त्यामुळे कमी गर्दीत हा सण साजरा होईल.

Published by: Pooja Jagtap
First published: August 8, 2022, 3:30 AM IST

ताज्या बातम्या