Jivati Pooja 2022 : जिवतीची पूजा केव्हा आणि कशी करावी, जाणून घ्या सर्व धार्मिक माहिती 

 Jivati Pooja 2022 : जिवतीची पूजा केव्हा आणि कशी करावी, जाणून घ्या सर्व धार्मिक माहिती 

श्रावण महिना सुरू झाला की देव्हाऱ्यात किंवा इतर ठिकाणी जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. शुक्रवारच्या पूजेचे महत्व जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : श्रावणात महादेवाच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करण्याचा हा महिना असतो. श्रावणात अनेक घरांमध्ये धार्मिक पथ्ये पाळली जातात. अनेकजण या काळात मांसाहार वर्ज्य करतात. श्रावण महिना सुरू झाला की देव्हाऱ्यात किंवा इतर ठिकाणी जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार बरोबर श्रावणी शुक्रवारही महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते. जिवतीची पूजा होते. आज 5 ऑगस्ट रोजी श्रावणी शुक्रवार आहे. जिवतीची पूजा, शुक्रवारची कहाणी यांविषयी जाणून घेऊया.

जिवतीची पूजा श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. यासह 21 मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

जिवतीची कहाणी -

जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिका पूजनामुळे घरात, आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 5, 2022, 6:00 AM IST

ताज्या बातम्या