Rakshabandhan 2022 : भावाला राखी बांधताना किती गाठी मारणे असते शुभ? या मुहूर्तावर बांधा राखी

Rakshabandhan 2022 : भावाला राखी बांधताना किती गाठी मारणे असते शुभ? या मुहूर्तावर बांधा राखी

रक्षाबंधन काही दिवसांवर आले आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी (गुरुवारी) रक्षाबंधन साजरे केले जाईल. या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि भावाला कोणत्या दिशेला बसवून राखी बांधावी हे जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट : दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आरोग्यासाठी, आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. तर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी (गुरुवारी) रक्षाबंधन (Rakshabandhan 2022 Date) साजरे केले जाईल. धार्मिक मान्यतांनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी योग्य मुहूर्तावर राखी बांधणे शुभ मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया रक्षाबंधनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

तीन गाठी बांधणे मानले जाते शुभ

रक्षाबंधनाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा राखीच्या धाग्याच्या तीन गाठी बांधतात. धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीशी संबंधित आहेत अशी मान्यता आहे.

Vastu Tips: अशा गोष्टी स्टोअर रूम, किचनमध्ये कधीच ठेवू नयेत, नाहक अडचणी वाढत जातात

राखी बांधताना भावांचे तोंड कोणत्या दिशेला असावे?

राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ स्वत:च्या दीर्घायुष्यासाठी, तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते असे मानले जाते. त्यामुळे भावाला राखी बांधताना नेहमी तीन गाठी बांधणे शुभ असते. धार्मिक मान्यतेनुसार राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे.

डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आणि वेळ

11 ऑगस्ट 2022 रोजी (गुरुवारी) सकाळी 09:35 पासून पौर्णिमा सुरू होत आहे. परंतु यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भाद्रा काळ आहे. ज्योतिषशास्त्रातील ‘शुभकरं पुच्छं एवम् वासरे शुभकारी रात्रौ’ या तत्त्वानुसार गुरुवारी सायंकाळी 05:40 नंतर शुभ योग (Rakshabandhan 2022 Shubh Muhurta) तयार होईल. 12 ऑगस्ट 2022 रोजी भाद्रा नाही. परंतु पौर्णिमा फक्त सकाळी 07:16 पर्यंत आहे. त्यामुळे या दिवशीही रक्षाबन साजरे केले जाणार आहे.

Published by: Pooja Jagtap
First published: August 5, 2022, 9:45 AM IST

ताज्या बातम्या