मराठी बातम्या /बातम्या /religion /शिंगणापुरात असे प्रकट झाले होते शनिदेव! त्या वाहत आलेल्या शिळेवर दगड मारला अन्...

शिंगणापुरात असे प्रकट झाले होते शनिदेव! त्या वाहत आलेल्या शिळेवर दगड मारला अन्...

शनि शिंगणापूर मंदिराची पौराणिक कथा

शनि शिंगणापूर मंदिराची पौराणिक कथा

शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात एके दिवशी मुसळधार पावसामुळं नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली होती...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 फेब्रुवारी : नवग्रहांमध्ये शनिदेवांना सर्वजणच घाबरतात हे आपणा सर्वांना माहीत आहेच, शनिदेवाची वक्र दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला जगणं नकोस होऊन जातं, मग तो कितीही बलवान असो वा श्रीमंत. शनिदेव हे त्यांचे वडील सूर्यदेव यांच्यासारखे तेजस्वी आणि त्यांचे गुरुदेव भगवान शिव यांच्यासारखे गंभीरही आहेत.

कर्मफळदाता म्हणून ओळखले जाणारे शनिदेव महाराज माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात आणि ते सर्वसामान्यांचे परम शुभचिंतकही मानले जातात. आज आपण शनिदेवाच्या शिंगणापूरमधील सर्वात प्रसिद्ध मंदिराविषयी जाणून घेऊया.

जेव्हा एक दिव्य शिळा शिंगणापूरला आली -

शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात एके दिवशी मुसळधार पावसामुळं नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली होती, त्यावेळी शिंगणापूरच्या नदी काठावर एक मोठा काळा खडक आला होता. काही दिवसांनी गावातील काही मुलं तिथे खेळायला आली, मुलं माती आणि दगडांनी खेळू लागली आणि एका लहान मुलाने चुकून त्या काळ्या दगडावर एक मोठा दगड आपटला.

प्रत्येकाला प्रेत-आत्मा दिसला -

दगड आदळताच त्या दगडातून जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि त्याचवेळी त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, हे भयानक दृश्य पाहून सर्व मुले घाबरून घराकडे पळाली. तेथे गेल्यानंतर घाबरलेल्या मुलांनी हा सगळा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर संपूर्ण गाव त्या खडकाला पाहण्यासाठी नदीच्या काठावर जमा होऊ लागला. तो विचित्र खडक पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं आणि काहीजण त्या खडकाला भूत म्हणू लागले, काही वेळाने ते सर्वजण गावात परतले.

शनिदेवानेच वास्तव सांगितलं -

त्या रात्री शनिदेव महाराजांनी गावाच्या प्रमुखाला स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की, ते स्वतः खडकाच्या रूपात आपल्या गावात आले आहेत. हे ऐकून गावाच्या प्रमुखाला खूप आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने संपूर्ण स्वप्न गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांनी फार विलंब न लावता बैलगाडी वगैरे घेऊन नदीकाठी दाखल झाले. तेथे लोकांनी शनिदेवाचा जयजयकार करत पूर्ण आदराने त्यांना बैलगाडीत बसवून गावात आणून प्रतिष्ठापना करण्यात आली.

शिंगणापुरात कधीच चोरी नाही होत -

शनिदेव ज्या दिवसापासून शिंगणापुरात वास्तव्यास आले, त्या दिवसापासून तेथे चोरी, दरोडे वगैरे प्रकार घडत नाहीत. जगातील हे एकमेव गाव आहे जिथे घरांना दरवाजे नाहीत, एक-दोनदा काही चोरांनी तिथे जाऊन चोरीचा प्रयत्न केला पण ते फसले आणि त्यांना चांगलाच धडा शिकवला गेला.

हे वाचा - पंचक असताना मृत्यू झाल्यास 5 जणांचा होतो मृत्यू! का ठरतो अशुभ काळ

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Shani Jayanti